श्री गणराज जैन यांनी अपंग आणि अनाथ प्राण्यांच्या सेवा संगोपन करणाऱ्या ‘पाणवठा’ ह्या त्यांच्या संस्थेविषयी माहिती सांगितली तसेच त्यांच्या जीवनप्रवासातील आठवणी मन माझे ग्रुप सोबत शेयर केल्या.

श्री गणराज जैन आणि डॉ. अर्चना जैन  यांनी सुरु केलेले "पाणवठा" हे भारतातील पहिले अपंग प्राण्यांचे अनाथाश्रम आहे. या आश्रमात अंध, अपंग किंवा अपघातात जखमी झालेल्या पाळीव-जंगली पक्षी-प्राण्यांचे  विनामूल्य उपचार केले जातात आणि अगदी पोटच्या लेकरांप्रमाणे त्यांची इथे काळजी घेतली जाते आणि त्यांना कायमस्वरूपी आसरा दिला जातो. अनेक प्रकारच्या सामाजिक तसेच आर्थिक अडचणींना तोंड देऊन  श्री गणराज जैन आणि डॉ. अर्चना जैन इथे सर्व  प्राण्यांची काळजी घेत आहेत.

 ३ वेळा अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे या आश्रमाचे खूप नुकसान झाले होते आणि त्यासाठी आता ह्या प्राण्यांना कायमस्वरुपी सुरक्षित अशी जागा देण्यासाठी प्रयन्त सुरु आहेत आणि त्यासाठी खूप आर्थिक मदतीची गरज आहे. आज अगदी स्वतःचे घरदार, मौल्यवान वस्तू ,फर्निचर इत्यादी विकून जैन परिवार या आश्रमाच्या पुर्नवसनाचे काम करत आहेत.

मन माझे ग्रुप तर्फे आम्ही सर्वाना, विविध संस्था, दानशूर व्यक्तींना आम्ही आवाहन करत आहोत कि तुम्ही सुद्धा एकदा पाणवठा अनाथाश्रमाला भेट द्या आणि काही आर्थिक मदत करून आश्रमाच्या कार्याला हातभार लावावा.  

आश्रमाचा पत्ता:
पाणवठा अपंग प्राण्यांचा अनाथाश्रम
कांबरी फार्मच्या मागे, पोद्दार कॉम्प्लेक्स जवळ,
बदलापूर-कर्जत रोड, चामटोली, बदलापूर (पूर्व)

धन्यवाद
मन माझे ग्रुप

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top