अजूनही आठवतोय मला तो पहिला वेलेन्टाइन ...!
ज्या दिवशी आम्ही दोघे पहिल्यांदा भेटलो होतो..!
तिला भेटण्याच्या आतुरते मध्ये मला त्या
आदल्या रात्री झोपच आली नाही
कधी एकदाची ती रात्र संपते... आणि
सकाळ होते.. आणि कधी एकदाचा
मी तिला भेटायला जातोय असं मला झाले होते.!
सकाळ झाली मी उठलो, आंघोळ केली..!
फुटलेल्या आरशा समोर उभा राहून जुना पण,
स्वछ असा ड्रेस मी घातलेला होता..!
केस व्यवसित करून तयार झालो.
आदल्या दिवशी मित्राकडून,
आणलेली सेंट ची अर्धी बॉटल मी,
माझ्या कपड्यावर ओतली.
तेवढ्यातच आई ने आवाज दिला,
नाश्ता तयार आहे खावून जा.,
आईला मला नाश्ता नको असे,
बोलत मी खिशामध्ये हाथ घातला,
बघतो तर काय माझाकडे,
फक्त दोनच रुपये होते,
मी आईला कॉलेजची फी भरण्यासाठी ,
५० रुपये मागितले तर तिने नकार दिला,
मी तसाच निराश होवून निघालो,
जाता जाता शेजाऱ्यांच्या बागेतील,
एक लाल गुलाबाचे फुल चोरून घेतले.
कधीही लवकर कॉलेजला न जाणारा मी,
आज मात्र सगळ्याच्या अगोदर आलो होतो.
तिला भेटण्याचा एक एक क्षण,
जवळ जवळ येत होता तस-तशी,
माझा मनातली भीती वाढतच जात होती,
पण आज मी निचय करूनच आलो होतो की,
आज तिला विचारल्याशिवाय जायच नाही.
सकाळचे ८ वाजले ती ठरलेल्या वेळेप्रमाणे आली,
नि माझा समोर येवून उभी राहिली.
मी घाबरत घाबरत तिला गुड मोर्निंग बोललो,
तिने पण मला गुड मोर्निंग केले.
तेव्हा कुटे तरी मला थोडेसे बरे वाटले,
नंतर मी तिला बोललो ,
मला तुला काही तरी सांगायचे आहे,
ती लाजत लाजत बोली "बोल"
मी डोळे मिटून धीर धरून तिला
आय लव यु ...! म्हटलं.
तसं तिने खाली वाकून sandal,
पकडणार एवढ्यातच मी तीचापासून,
दूर अंतरावर गालावरती हाथ ठेवून उभा,
राहिलो पण ती sandal ची पट्टी लावत ,
मला सेम टु यु...!!! म्हणाली. :)
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.