मित्रांनो नवरात्रीच्या उपवासाला लवकरच सुरुवात होणार आहे, या काळामध्ये
आहार कसा असावा, व्यायाम कसा करावा व यातून ३-५ किलो वजन कसे कमी करावे
याबद्दल वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधोपचार करणारे लातूर येथील डॉ.
पवन लड्डा यांचा लेख खास तुमच्यासाठी व तुमच्या परीवारासाठी सादर करत
आहे. तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांना देखील फॉरवर्ड करा.

नवस आरोग्याचा......... वसा वजन कमी करण्याचा !

श्राध्द पक्ष संपुन काही दिवसांनी घट स्थापना होऊन नवरात्रीचा प्रारंभ
होत आहे. भगवती आदिशक्तीची पुजा संपुर्ण देशामध्ये आपापल्या रितीप्रमाणे
मांडली जाते. कित्येक लोक नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करुन आपली भक्ती
व्यक्त करतात. उपवासाच्या निमित्ताने वजन कमी करण्याचे यंदा व्रत घेउ या,
यंदा शक्तीच्या उपासनेत उर्जा खर्ची घालु या. आपण उपवास तर करतो आणि मग
दिवसभर काय खातो तर कुठे शाबुदाना, शेंगदाणा, बटाटा, रताळी असे पिष्ठमय
पदार्थ. बाद करा हे सर्व पदार्थ आपल्या आहारातून. नवरात्रीच्या उपवासाची
एक नवीन संकल्पना रुजवु या.

सर्वात अगोदर संकल्प करा की मला माझे वजन कमी करायचे आहे. उपवासाच्या
निमित्ताने का होईना लठ्ठपणा कमी करण्याची सुरवात करणार. दसरयाला घालायला
जे नवीन कपडे निवडले आहे ते थोडे आधिच्या नंबरचे निवडा, दसरयाला मी ते
घालणारच. अर्थात त्या कपड्यात मी फिट बसणार असा मनाशी निर्धार करा.

त्यासाठी करावा लागेल व्यायाम. तुम्ही विचार कराल आधीच उपवास अजुन कुठे
व्यायाम करुन थकवा उद्भवु द्यायचा, पण मनातून हा गैरसमज काढुन टाका, की
व्यायामाने थकवा येणार नाही. योग्य पध्दतीने व्यायाम केल्यास थकवा न येता
दिवसभराचे काम करण्यास उत्साह येतो, आपला स्टॅमिना वाढतो, शिवाय वजन कमी
होते, पण अजुन एक विचार मनात येणार देवीच्या भजन पुजना मध्ये कशाला
व्यायामाचा अडथळा, तर नाही आपण भक्तीच्या मार्गानेच व्यायामाचा अवलंब
करणार आहोत त्यासाठी

१) देवीदर्शनाला गेल्यास देवीच्या मंदिराला संपुर्ण १०८ प्रदक्षिणा घाला.

२) देवीला लोटांगन घालून ११ नमस्कार घाला.

३) देवीच्या मंदिराला जाण्यासाठी पायी जाण्याचा पर्याय निवडा, पण मंदिर
मात्र दुरचे असावे.

४) आपण केलेल्या चुकांची उठबश्या करुन क्षमा मागा.

५) रात्री उशीरा पर्यंत जागुन भजनात दंग व्हा किंवा गरबाच्या कार्यक्रमात
सामिल व्हा.

जमतील ना साधे सोपे हे व्यायामाचे पर्याय.

या सोबत खाण्यापिण्याचे वेळापत्रक देखील सांभाळायचे आहे. या नवरात्रीला
आपल्याला खायच आहे भरपुर फळे, दुध, ताक,राजगिरा लाह्या, काकडी वगैरे.
खाण्यापिण्याचा दिनक्रम योग्य तरहेने होण्यासाठी नवरात्रीच्या नऊ दिवसाचा
एक छानसा वेळापत्रक तुमच्या साठी बनविला आहे. आमच्या चिकित्सालयात या
प्रकारे वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे साधे सोपे व्यायाम व विविध
प्रकार्चे आहार नियोजन वेळापत्रक रुग्णांना दिले जाते.

- दररोज सकाळी उठल्याबरोबर एक ग्लास गरम पाणी प्यावे.

त्यानंतर बिना साखरेचा चहा किंवा बिनासाखरेचा विलायची युक्त दुध प्यावे.

दिवस १

सकाळी ८ ते ११- १०-१५ खिसमिस व ४ बदाम

दुपारी १२-२- १-२ संत्री किंवा मोसंबी/ फळ

दुपारी२-५- १-२ ग्लास ताज ताक

संध्याकाळी ६ ते ८-- राज्गिरा पोळी व भेंडिची भाजी

--------------------------------------------------

दिवस २

सकाळी ८ ते ११- १-२ आक्रोड व ४ बदाम

दुपारी १२-२- संत्रा किंवा मोसंबी

दुपारी२-५- ताज ताक किंवा उसाचा रस

संध्याकाळी ६ ते ८-- राजगीरा पिठ व काकडी खिसाची थालिपीठ व राजगिरा पिठाची कढी

--------------------------------------------------

दिवस ३

सकाळी ८ ते ११- १ उकड्लेला बटाटा

दुपारी १२-२- अननस

दुपारी२-५- ताक किंवा उसाचा रस किंवा नारळ पाणी

संध्याकाळी ६ ते ८--काकडिची कोशींबीर व राजगीरा चपाती

--------------------------------------------------

दिवस ४

सकाळी ८ ते ११- ४-५ बदाम व थोडीशी चारोळी

दुपारी १२-२- sesonable fruit

दुपारी२-५- ताक-नारळ पाणी

संध्याकाळी ६ ते ८-- राजगीरा लाही व बिनसाखरेचे दुध

--------------------------------------------------

दिवस ५

सकाळी ८ ते ११-४ खारीक ४ बदाम

दुपारी १२-२- पपई

दुपारी२-५- ताक किंवा उसाचा रस

संध्याकाळी ६ ते ८-- २ राजगिरा लाडु किंवा काकडिची कोशींबीर

--------------------------------------------------

दिवस ६

सकाळी ८ ते ११- २० मनुक्के व ४ बदाम

दुपारी १२-२- राजगिरा लाडु

दुपारी२-५- नारळ पाणी किंवा ताक

संध्याकाळी ६ ते ८-- राजगीरा चपाती व राजगीरा पिठाची कढी

--------------------------------------------------

दिवस ७

सकाळी ८ ते ११- भाजलेले शेंगदाणे व गुळ

दुपारी १२-२- डाळींब

दुपारी२-५- नारळ पाणी

संध्याकाळी ६ ते ८-- राजगिरा चपाती व राजगिरा पानाची भाजी किंवा कढी

--------------------------------------------------

दिवस ८

सकाळी ८ ते ११- कॉफी व राजगिरा बिस्कीट

दुपारी १२-२- डाळींबाचा रस, अजीर

दुपारी२-५- नारळ पाणी किंवा ताक

संध्याकाळी ६ ते ८-- राजगिरा पिठाचे उपीट

--------------------------------------------------

दिवस ९

सकाळी ८ ते ११- १-२ वाटी ताजे घट्ट दही

दुपारी १२-२- सफरचंद-पपई-खजुर

दुपारी२-५- ताक किंवा नारळ पाणी किंवा उसाचा रस

संध्याकाळी ६ ते ८-- राजगीरा पोळी व काकडीची भाजी.

याशिवाय दिवसभरात अधुन मधुन बिना साखरेचे लिंबु पाणी प्यावे.

दररोज रात्री झोपतान १ ग्लास कोमट पाणि प्यावे.

अशा प्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस आपणास हा आहारक्रम सुरू ठेवायचा आहे.
जेणे करुन नक्किच आई भवानी आपंणास पावेल. हा आहार घेताना लक्षात घ्या
दररोज वेगवेगळ्या पदार्थाची आपण निवड केली आहे. जेणे करुन सर्व प्रकारची
जीवनसत्वे आपल्या शरीरात जातील व आपणास कुठल्याही प्रकारे उपवासाने अशक्त
पणा येणार नाही . राजगिरा हा पदार्थ मात्र दररोज वापरायचा अहे. कारण
राजगिरा हा पचण्यास अत्यंत हल्के आहे, याने पोट तर भरते मात्र वजन वाढत
नाही, शिवाय या मध्ये भरपुर मात्रेत कॅल्शियम आहे. राजगिरा धान्य
बाजारातून आणुन स्वच्छ करून घरी त्याच्या लाह्या फोडाव्यात. गॅस वर गरम
झालेल्या कडाईमध्ये थोडाथोडा राजगिरा टाकत जावा व हलवित राहावे.
क्षणार्धात लाह्या फुटतात तसे तसे त्या बाजुला काढा ह्याच लाह्या मिक्चर
मधुन काढल्यास त्याचे पीठ तयार होते. याचीच आपण पोळी करून खायची आहे. यात
शाबुदाना किंवा भगरीचे पीठ कालविण्याची गरज नाही. तसेच कुठल्याही प्रकारे
साखरेचा वापर करु नये. या काळात खुप वेळ उपाशी राहु नये. थोड्याथोड्या
अंतराने आपण खात राहायचे आहे. कारण आपण ऐकलेच आहे की भुके पेठ भजन ना
होये. म्हणुन आधी पोटोबा मग विठोबा. फळांचा वापर करताना त्यात काळे मिळे
पावडर टाका. फळांचे मिल्क शेक करु नका. सर्व पदार्थ घरी बनवुन खावे.
वेळापत्रकानुसार दुसरया दिवशी काय खावे याचे नियोजन आदल्या दिवशी करावे.
जेणे करुन ऐन वेळा धावपळ होणार नाही. गंभीर आजारांनी ग्रस्त, मधुमेही
रुग्णांनी उपवास करु नये.

तर आशा आहे,तुम्हाला हा उपवासाचा वेळापत्रक निश्चितच आवडेल. तुम्ही
भक्तीवान आहात याचा अवलंब करून माता जंगदबेला नक्किच प्रसन्न कराल ही
अपेक्षा. अंबे आईचा उदो उदो, जय मातादी !!!!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top