इवलेसे. चर्चा, ओळख पाळख सुरु होती. आणि विशेष म्हणजे या सगळ्यानमध्ये माणूस
सुद्धा होता. माणसाकडे कुतूहलाने पाहत सगळेच म्हणत होते, " हा प्राणी फारच सुंदर आणि
आपल्याहून हुशार आहे. " हे माणसाने ऐकलं आणि फार खुश झाला.
आलं..........काही हत्ती त्याच्या बद्दल बोलत होते. न राहून त्याने एका हत्ती ला विचारल. " तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? "हत्ती: " हो......... म्हणजे बघ ना, देवाने आम्हाला सर्वांना एवढा मोठ्ठा पोट
दिलाय आणि तुला फक्त वितभर. " हे ऐकून सगळ्यांनीच सहमती दर्शवत म्हटले " हो, हे चुकीच आहे. "
हे ऐकून माणूस नाराज झाला. रागाने तो पुन्हा देवा जवळ गेला, आणि विचारू लागला, " देवा माझ्यावर हा अन्याय का? त्या सर्व जनावरांना एवढा मोठ पोट दिलंस, मग मला इतका लहान का? "देव: " तू नको चिंता करू , मी तुला जेवढं पोट दिलंय ना ते योग्यच आहे .
विश्वास ठेव."
माणूस: " नाही, ते काही नाही. तू दुजा भाव करतोयस देवा, मला हि इतरांसारखं मोठ
पोट हवंय. मी नाही ऐकणार. "
देव: " बर ठीक आहे, देतो मी तुला मोठ पोट. पण एक गोष्ट! "
माणूस: " काय देवा? "
देव: " मी तुला आता दिलेलं पोट आहे ना ते आधी पूर्ण भरून ये. ते भरलं कि
तूमला सांग. मी लगेच तुला मोठ पोट देईन. "हे ऐकून माणूस खुश झाला आणि आनंदाने पृथ्वीवर परतला.
पण मग पुढे काय झाल?............................................
आणि या युगात तर माणूस खातोच आहे................. पण अजून तो देवाला सांगायला
नाहीगेलाय कि देवा माझ पोट भरलंय.........काय? पटतंय ना आजची परिस्थिती पाहून?
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.