हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया,
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया,
हे देवा दिली हाक,उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया,

मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया,
हे देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया,
तुझ्याइना माणसाचा जन्म जाई वाया,
हे देवा दिली हाक,उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया ||धृ||


ओँकाराचं रुप तुझं चराचरामंदी,
झाडयेल-पानासंग फुल तु सुगंधी,
भगताचा पाठीराखा गरीबाचा वाली,
माझी भक्ति तुझी शक्ती एकरुप झाली,
देवा दिली हाक,उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया||१||


आदिअंत तुच खरा तुच बुद्धिदाता,
शरण मी आलो तुला पायावर माथा,
डंका वाजं दहा दिशी गजर नावाचा,
संकटाला बळ देई अवतार देवाचा,
देवा दिली हाक,उद्धार कराया,
आभाळाची छाया तुझी, समिंदराची माया,
मोरया मोरया मोरया मोरया,
मोरया मोरया मोरया मोरया||२||
गणपती बाप्पा-मोरया
मंगलमुर्ती-मोरया
मोरया-मोरया
मोरया-मोरया,
मोरया मोरया मी बाळ तान्हे, तुझीच सेवा करु काय जाणे, अन्याय माझे कोट्यानुकोटी, मोरेश्वराबा तु घाल पोटी।
।।गणपती बाप्पा मोरया।।

चित्रपट : उलाढाल
संगीत : अजय-अतुल

Post a Comment Blogger

 
Top