एक लहान लेकरू त्याच्या काळ्या सावळ्या रंगामुळे, त्याला चीडवलेल्या शब्दांमुळे कंटाळून बाबांना प्रश्न विचारतंय.
बाबा मला का दिला देवाने रंग हा सावळा ?
हिणवी सारे जण म्हणतात हो कावळा.
आता बाबा लेकराला कसं उत्तर देतात ते पहा.
आहेस जशी तू तशी आवडे आम्हाला,
का ग भूळलीस तू त्या गोरया रंगाला.
काळा कुट्ट ग कावळा त्याचे नाव ऐसे घ्यावे,
पूर्वजांची होती माया म्हणुनी जेवू त्यांना द्यावे.
मग विचार मनाला तुझा रंग तरी कैसा,
बघ मनही म्हणेल तू वागशील तैसा.
काय वाईट आहे का काळा सावळा हा रंग,
साऱ्या ह्याच भांडणात होई जातीची ग जंग.
काळ्या रंगानेही केली साऱ्या जगावर मात,
घेतली बुद्धीच्या जोराने थोपटून आपली पाठ.
काळ्या सावळ्या रंगाची बघ झाली किती गाणी,
या रंगाची महती गीतकार सुद्धा जाणी.
कोणी ओळखता यावे देवाने रंग मारीयला,
गोरया रंगाचे ग श्रेष्ठ लोकांनी अर्थ लावियला.
देवाचा देव कृष्ण तोही बघ काळा,
सोळा सहस्त्र बायका घाली त्याला कि ग माळा.
निळे पांढरे आकाश तेही होते बघ काळे,
काळ्या रंगाची ती किमया दिसती पावसाळे.
एकमेकांत मिळूनी बनतात रंग सारे,
मग आपल्यात का भेदभाव हा असा रे.
हे खास कवी रसिकांसाठी.......
वाटे मज आता तुम्ही आहात हो रंग,
बघा रंग हे वेगळे झाले कवितेत दंग.
कविता ऐकुनी करती बात आपसात,
सारे सावळ्या कवीची कविता ऐकतात.
साभार कवी: विशाल गावडे.
Post a Comment Blogger Facebook