प्रिय मित्रानो
दिनांक १५ ऑगस्ट २०१५  स्वातंत्र्य दिनानिमित्त मन माझे आणि हेल्पिंग हॅण्ड ग्रुप कडून वात्सल्य बालिकाश्रम, सानपाडा येथील मुलींसाठी मदत योजना राबविण्यात आली. हा कार्यक्रम अत्यंत सुरेखरित्या पार पडला याचे श्रेय आश्रमातील मान्यवर श्री नलावडे काका, रायकर मॅडम, नंदा  मॅडम, बर्वे मॅडम तसेच सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे आहे. 




या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान मुलीसाठी आमच्याकडून नाश्त्यासाठी खाऊ,
जेवणासाठी वस्तू पुरवठा, नेहमी लागणार्या उपयोगाच्या वस्तू, वस्त्र दान, अन्नदान, देणगी आणि काही भेटवस्तू देण्यात आल्या. 



सुरवातीला ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर  उपस्थित मान्यवरांचे मोलाचे शब्द सर्वांच्या कानी पडले सोबत तेथील काही मुलीनी देशभक्तीवर गीते सादर करून कार्यक्रमाला आणखीन सोनेरी क्षण दिले. 




त्यांनतर स्वातंत्र्यदिन आणि या महिन्यातील ज्या ज्या मुलींचे आणि वृद्ध आजी आजोबांचे वाढदिवस आहेत त्यांचे वाढदिवस साजरे करण्यासाठी आम्ही जो  केक घेवून गेलो होतो आणलेला तो कापण्यात आला आणि त्याचा आस्वाद सर्वांनी घेतला 
 
 
 
थोडासा अल्पोपहार करून रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. सर्व मुलीनी मन माझे ग्रुप मधील सदस्यांना राखी बांधून एक प्रेमळ असे बहिण भावाचे नाते निर्माण केले. 
 

त्यानंतर आमच्याकडून आणलेल्या भेटवस्तू सर्वांना देण्यात आल्या. तेथील वृद्धाश्रमातील आजी आजोबाना सुद्धा काही सदस्यांनी भेट देवून त्याचं हितगुज ऐकल
 
 

येथील स्वयंसेवक , संस्थापक , शिक्षिका या सर्वांच्या बोलण्यातून आश्रमाविषयी असणारी वात्सल्यता दिसून आली , लहान मुलींची मानसिकता समजून  घेवून त्यांना योग्य प्रकारे वागणूक आणि त्यांची काळजी येथे घेतली जाते. खर्या अर्थाने हा एक वात्सल्यदायी अनुभव होता. 
 
 

ज्या सभासदांनी या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले आणि सहभागी झाले त्या सर्वांचे आम्ही शतशः ऋणी आहोत.


धन्यवाद 
सचिन हळदणकर

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top