"पित्त शामक आणि आरोग्यदायी : कोजागिरी"


आज अश्विन पौर्णिमा,अर्थात्‌ कोजागिरी पौर्णिमा !!सणांचा विचार करताना देखील आपल्या पूर्वजांनी आरोग्याची किती छान काळजी घेतली आहे पहा. शरद ऋतु चालू आहे. निसर्गतःच पित्त वाढण्याचा हा काळ...आटीव दूध आणि शीतल चांदणे या दोन्ही गोष्टी पित्त कमी करणाऱ्या आहेत.याव्यतिरिक्त; मौजमजा आणि गप्पाटप्पा यांमुळेदेखील पित्ताचे शमन होते.सध्याच्या काळात जिथे तिथे stress दिसत असताना याहून अधिकचांगली Stress Buster Therapy काय बरे असेल??? हाच तर आयुर्वेदाचा मोठेपणा आहे!!

असे म्हणतात की या रात्री जागून लक्ष्मी आणि कुबेराची पूजा केल्यास वैभव मिळते...अहो; वैभव जरूर मिळेल..पण कोणाला??? जो निरोगी आहे त्यालाच. म्हणून तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाही आपण म्हणतो की; "जीवेत् शरदः शतम् |"...शरदच का?? इतर कुठला ऋतु का नाही??? कारण सर्वाधिक रोग शरदातच होतात म्हणुन !! याकरताच आयुर्वेदातील एक वचन प्रसिद्ध आहे- " वैद्यानां शारदी माता|" शरद ऋतु हा अधिक रुग्ण देणारा असल्याने वैद्यांना आपल्या आईसारखा वाटतो!! अर्थात; यातील मजेचा भाग सोडून द्या! लक्षात ठेवण्याची गोष्ट हीच की; आपण अशा संस्कृतीचा घटक आहोत जिच्यातील प्रत्येक प्रथेमागे काही ना काही अर्थ दडलेला आहे.
त्यामुळे; आज रात्री गच्चीवर जा ; मस्तपैकी दूध आटवून त्यात छानपैकी केशर वगैरे घालून; आपल्या मित्रपरिवारासोबत गप्पा मारत-मारत त्याचा आस्वाद घ्या!! आरोग्याचे वैभव नक्की प्राप्त होईल.संपत्ती पण त्यालाच मिळेल ज्याच्या डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असेल!! आणि पित्त शांत असल्याशिवाय या दोन्ही गोष्टी शक्य नाहीत!!

सर्वांना कोजागिरीच्या अनंत शुभेच्छा!!

Post a Comment Blogger

 
Top