( वाढदिवसाचे मराठी मेसेजेस, शुभेच्छा यांचा संग्रह मन माझेच्या प्रिय सभासदांसाठी करत आहे )


काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात..
अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही!
म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे.

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
------------------------------

आज तुझा वाढदिवस
वाढणार्‍या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो

आणि
सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्चा
--------------------------

प्रत्येक शब्दाने तुझ्या मैफ़लीचे गीत व्हावे
सूर तुझ्या मैफ़लीचे दूर दूर जावे 
तुजपुढे ठेंगणे व्हावे त्या उंच अंबराने
साथ तुझी द्यावी यशाच्या प्रत्येक शिखराने
बागडावे तू
नभी उंच उडावे तू
बनुन मोती सुंदरसा शिंपल्यात पडावे तू
वाढदिवसाच्या शुभेच्छा


--------------------------------

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण
तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो

आणि
या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

------------------------------

आज **** चा वाढदीवस आज मी तीला लाख लाख शुभेच्छा देतो,
माझे सर्व सुख तिला आणि तिचे सर्व दुःख मी घेतो.
प्रिये प्रत्येक दिवस तुझा असा असावा, कि प्रत्येकाला तुझा हेवा वाटावा.
तुझ्या जिवनात कधी दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखाने भरलेली तुझी ओंजळ असावी.
देवाने तुला इतकी खुशी द्यावी, की तु एका दुःखासाठी तरसावी.
आज देवाला हात जोडूणी सांगतो, तुझ्यासाठी मी एकच मागणी मागतो. की हे देवा माझ्या मैत्रिणीला आज असंख्य आनंदाने भरलेले समुद्र द्यावे.
त्याच्यासाठी जर कुणाचा जीव पाहीजे असल्यास तर माझे प्राण आनंदाने घ्यावे.....
वाढदीवसाच्या हार्दीक शुभेच्छा

---------------------------------

Post a Comment Blogger

  1. good wishes for birthday are very fine. I liked them

    ReplyDelete
  2. वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे, सोबत ...

    ReplyDelete
  3. एक स्वप्न आहे माझं,
    तुझ्यासोबत आयुष्य जगण्याच.....
    स्वप्नांच एक घरटं बांधून,
    त्यात.....!!!
    तु अन् मी सोबत राहण्याच.....!!
    🌹🍂🌼🌷🌾🌺🌿🍁

    ReplyDelete

 
Top