आपण सगळे दरवेळेस बोलतो मला सगळ माहित आहे , मला सगळ पटत… पण एक सांगू सगळ कळून पण आपल्याला वळत नाही .
तुम्हाला
" या चिमण्या नो परत फिरा रे …… , आणि देव जरी मज कधी भेटला …… हि गाणी
माहित असतीलच . आपण बाहेर गेल्यावर कधी परत येऊ याची आपले आई वडील आतुरतेने
वाट पाहत असतात . तर देवाजवळ नेहमी आपल सार आयुष्य आपल्या मुलाला मिळाव
हेच मागणारी आपली आई . या गाण्यांचा अर्थ सांगण्याचा उद्देश हा माझा हा
अनुभव सांगुन जाइल.
काल १५ ऑगस्ट २०१४ ला स्वातन्त्र दिनाच्या निमित्ताने मन माझे सेवाभावी संस्था या माझ्या ग्रुप च्या वतीने आम्ही सर्वांनी एका वृद्धाश्रमाला भेट द्यायची ठरवली. मी पण हो म्हणाले वाटल वेगळ आणि तेवढाच टाईमपास होईल जाऊयात .ग्रुप मधील सभासदानी सगळी माहिती काढली आणि आम्ही सगळे "खडवली " टिटवाळा च्या पुढचे स्टेशन जेथे "मातोश्री वृद्धाश्रम" आहे तिकडे निघालो . तिकडील माननिय संचालीका नंदा ताईकडून गरजू सामानाची यादी मिळवलेली होती ते सामान यथाशक्ति घेवुन गेलेलो.
आम्ही
"मातोश्री वृद्धाश्रम" मधे प्रवेश केला, जेव्हा आम्ही सर्व तिकडे पोचलो
तेव्हा मनात विचार आला कि काहीतरी वेगळ अस्वस्थ करणार वाटतंय. आम्ही
सभागृहात पोचलो . सर्वांसाठी केक नेला होता . सर्व आजी आजोबांनी मिळून
खाल्ला. त्यांचे चेहऱ्यावर हसू होते जे खूप लाख मोलाचे होते . एका आजीने
गाण गायल इतक सुंदर आणि आपल्याला वाटत म्हाताऱ्या माणसांच्या काय लक्षात
राहणार पण ……
मन माझे ग्रुप तर्फे त्या दिवशी आम्ही अन्नदान ठेवलेल. बारा वाजले जेवणे उरकली आणि आम्ही सगळे विभागलो गेलो . एक आजोबा भेटले वय वर्षे ८२ म्हणाले चल मी तुम्हाला या आश्रमात आम्हाला काय काय मिळत ते दाखवतो , त्यांचा दिवसभराचा तक्ता त्यांनी दाखवला . सकाळी ७ पासून रात्री ९ वाजेपर्यंत काय काय असत ते सांगितल . १ ते ४ विश्रांती ची वेळ असते त्यांना अजून खूप काही बोलायचा होते आमि त्यांच्या विश्रांती चे वेळेची आठवण करून दिली पण ते मानले मी झोपणार नाही रेडीओ ऐकेन तुम्ही मला भेटायला नक्की या मी वाट बघेन . त्यांचा तो लहान मुलासारखा हट्ट आणि निरागस पण मला नको बोलताच आल नाही
आम्ही गेलो त्यांना भेटायला ते सांगत होते त्यांचे शब्द : " मी खूप आयुष्य पाहिलं चढ उतार पहिले इकडे गेली १५ वर्ष राहत आहे . पण एक सांगू जेव्हा एका घरात तु गेली ६० वर्ष आहेस आणि तुला अचानक तुझ्या मुलांनी अस वृद्धाश्रमात आणून सोडलं तर तुला कसा वाटेल . आम्ही इकडे खुश आहोत सर्व सुख सुविधा आहेत पण आतून खूप दुखी आहोत आपला कोणीच जवळ नाही पण परकी मानस आपली मानून राहतो . इतके वर्षात आम्हाला भेटायला देखील कोणी आल नाही घरच . आम्ही नकोसे झालो आहोत . त्यांचे डोळ्यात पाणी आल आणि माझ मन वेगळ्याच विचारात गेल त्यांनी मला त्यांची डायरी वाचायला दिली चोकलेट दिले खूप खूप खुश होते त्यांचा निरागस पण डोळ्यातले अश्रू खूप काही सांगून गेले .
माझा टाईमपास कुठल्याकुठे गेला , मी विचारल करत राहिले . जे आयुष्य आपले आई वडील आपल्याला देतात , त्यांना आपण काय देतो फक्त दोन वेळचे जेवण आणि प्रेमाचे शब्द ते पण देऊ शकत नाही . म्हातारपण , एकटेपणा आपल्यावर पण हि वेळ येईल आपली मुल पण असच वृद्धाश्रमात टाकतील पण अजूनही वेळ गेली नाही माणसाची किंमत जाणायला पाहिजे तो जिवंत आहे तोपर्यंत.. मेल्यावर तर सगळेच रडतात . हेच या अनुभवातून मी शिकले . मला वाटत एकदा तुम्ही पण जाऊन या त्यांची दुख समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्हाला हि चांगल वाटेल .
त्यांच दुःख कळेल सुद्धा आणि ……………… वळेल सुद्धा.

काल १५ ऑगस्ट २०१४ ला स्वातन्त्र दिनाच्या निमित्ताने मन माझे सेवाभावी संस्था या माझ्या ग्रुप च्या वतीने आम्ही सर्वांनी एका वृद्धाश्रमाला भेट द्यायची ठरवली. मी पण हो म्हणाले वाटल वेगळ आणि तेवढाच टाईमपास होईल जाऊयात .ग्रुप मधील सभासदानी सगळी माहिती काढली आणि आम्ही सगळे "खडवली " टिटवाळा च्या पुढचे स्टेशन जेथे "मातोश्री वृद्धाश्रम" आहे तिकडे निघालो . तिकडील माननिय संचालीका नंदा ताईकडून गरजू सामानाची यादी मिळवलेली होती ते सामान यथाशक्ति घेवुन गेलेलो.

मन माझे ग्रुप तर्फे त्या दिवशी आम्ही अन्नदान ठेवलेल. बारा वाजले जेवणे उरकली आणि आम्ही सगळे विभागलो गेलो . एक आजोबा भेटले वय वर्षे ८२ म्हणाले चल मी तुम्हाला या आश्रमात आम्हाला काय काय मिळत ते दाखवतो , त्यांचा दिवसभराचा तक्ता त्यांनी दाखवला . सकाळी ७ पासून रात्री ९ वाजेपर्यंत काय काय असत ते सांगितल . १ ते ४ विश्रांती ची वेळ असते त्यांना अजून खूप काही बोलायचा होते आमि त्यांच्या विश्रांती चे वेळेची आठवण करून दिली पण ते मानले मी झोपणार नाही रेडीओ ऐकेन तुम्ही मला भेटायला नक्की या मी वाट बघेन . त्यांचा तो लहान मुलासारखा हट्ट आणि निरागस पण मला नको बोलताच आल नाही
आम्ही गेलो त्यांना भेटायला ते सांगत होते त्यांचे शब्द : " मी खूप आयुष्य पाहिलं चढ उतार पहिले इकडे गेली १५ वर्ष राहत आहे . पण एक सांगू जेव्हा एका घरात तु गेली ६० वर्ष आहेस आणि तुला अचानक तुझ्या मुलांनी अस वृद्धाश्रमात आणून सोडलं तर तुला कसा वाटेल . आम्ही इकडे खुश आहोत सर्व सुख सुविधा आहेत पण आतून खूप दुखी आहोत आपला कोणीच जवळ नाही पण परकी मानस आपली मानून राहतो . इतके वर्षात आम्हाला भेटायला देखील कोणी आल नाही घरच . आम्ही नकोसे झालो आहोत . त्यांचे डोळ्यात पाणी आल आणि माझ मन वेगळ्याच विचारात गेल त्यांनी मला त्यांची डायरी वाचायला दिली चोकलेट दिले खूप खूप खुश होते त्यांचा निरागस पण डोळ्यातले अश्रू खूप काही सांगून गेले .
माझा टाईमपास कुठल्याकुठे गेला , मी विचारल करत राहिले . जे आयुष्य आपले आई वडील आपल्याला देतात , त्यांना आपण काय देतो फक्त दोन वेळचे जेवण आणि प्रेमाचे शब्द ते पण देऊ शकत नाही . म्हातारपण , एकटेपणा आपल्यावर पण हि वेळ येईल आपली मुल पण असच वृद्धाश्रमात टाकतील पण अजूनही वेळ गेली नाही माणसाची किंमत जाणायला पाहिजे तो जिवंत आहे तोपर्यंत.. मेल्यावर तर सगळेच रडतात . हेच या अनुभवातून मी शिकले . मला वाटत एकदा तुम्ही पण जाऊन या त्यांची दुख समजून घ्यायचा प्रयत्न करा तुम्हाला हि चांगल वाटेल .
त्यांच दुःख कळेल सुद्धा आणि ……………… वळेल सुद्धा.
लेखिका - स्नेहल शिंदे
( सभासद - मन माझे सेवाभावी संस्था )
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.