१०० लोकांचा एक समूह आयुष्यावर वक्तव्य
करणाऱ्या एका प्रख्यात वक्त्याचा सेमिनार अटेन्ड
करीत होते...
त्या वक्त्याने प्रत्येकाकडे एकेक फुगा (balloon)
दिला . प्रत्येकाने फुगा फुगवायचा आणि त्यावर
आपले नाव टाकून हॉल मध्ये सोडायचा होता. सर्व
लोक कामाला लागले. प्रत्येक जण आपण
फुगवलेल्या फुग्यावर स्वतः चे नाव टाकीत होता.
बघता बघता हॉल १०० फुग्यांनी भरून गेला...
नंतर त्या वक्त्याने सर्वांना ५
मिनिटांचा अवधी दिला आणि इतक्या साऱ्या फुग्यांतून
स्वतः चे नाव असलेला फुगा शोधायला लावला.!!
इतक्या भरगच्च फुग्यांतून
स्वतः फुगवलेला फुगा शोधताना सर्वांची तारांबळ
उडाली. ५ मिनिटे
संपली तरीही कुणीही स्वतः च्या नावाचा फुगा शोधू
शकला नाही!!
... नंतर त्या वक्त्याने प्रत्येकाला कुणाचेही नाव
असलेला एक फुगा उचलायला सांगितले. प्रत्येकाने एकेक
फुगा उचलला. वक्त्याने प्रत्येकाला सांगितले
की आपल्याकडे ज्याच्या नावाचा फुगा आहे
त्या माणसाला तो फुगा देऊन टाका.
अश्या प्रकारे प्रत्येकजण आपल्या हातातील फुग्यावर
ज्याचे नाव आहे त्याला तो देऊ लागला आणि २
मिनिटांत प्रत्येकाकडे
स्वतःच्या नावाचा फुगा आला.!!
यावर तो वक्ता बोलू लागला…
"आपल्या आयुष्याचेही असेच झाले आहे.! प्रत्येक जण
आनंद, सुख, समाधान या गोष्टी शोधण्यासाठी जंग
जंग पछाडतो आहे... परंतु खरा आनंद, खरे सुख कशात आहे
याची कुणालाही कल्पना नाही...
स्वतः चा खरा आनंद आणि खरे समाधान
इतरांच्या आनंदात दडलेला असतात.
इतरांना त्यांचा आनंद द्या आणि त्याबदल्यात
तुम्हालाही नक्कीच आनंद आणि समाधान मिळेल.
मानवी आयुष्याच्या यशाचे खरे गमक यातच आहे...."
हे ऐकून संपूर्ण हॉल नि:शब्द झाला....!
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.