तुम्ही खूप मन लावून वाचू नका. अहो, कारण या सगळ्या शक्यता आहेत. मी या लेखातून थोडा उपदेशाचा डोस पाजणार आहे. अर्थात उपदेश कोणाला हवा असतो... तो तुमच्यासाठी नाहीच मुळी. जर तुमचे लग्न झाले नसेल तर मुळीच नाही. माझ्या दोन चुलत भावंडांची नुकतीच लग्नं झालीत. अशा अवस्थेत तुम्ही ज्ञान मिळवण्याच्या शोधातच असता. अर्थात तुम्हाला पावलोपावली उपदेश, सल्ले मिळतात. पण, त्यातला उपयोगी कोणता याच गुंत्यात तुम्ही असता... ज्ञानाच्या झाडावरचे कोणते फळ फळणार हा प्रश्न नवख्यांना पडतो. पण जसे समुद्र किनाऱ्यावरचे दगड उंच लाटांना पेलतात तसे हे सल्ले लाईफ जॅकेटचे काम करतात...

आणि हे अमान्य करणारा मी कोण? मी जर याआधी तुम्हाला हे सांगितले नसेल तर आता इथे लिहितो. आमचे म्हणजे माझे आणि माझ्या बायकोचे लग्न मी २१ वर्षांचा असताना झाले. आणि हो...हो...मुझे उनमे रब दिखता है... याला अपवाद म्हणजे जेव्हा मी माझे कपडे जमिनीवर टाकतो, बूट पलंगावर फेकतो त्यावेळी ती चिडते तो क्षण. (मला त्यावेळी तिच्याकडे पाहिल्यावर आई आठवते सगळयात वाईट गोष्ट म्हणजे आई ओरडून गप्प तरी बसायची. पण ती तर थांबतच नाही...) पण असो.. सांगण्याचा मुद्दा तो नाहीये. आम्ही असे सगळे असतानाही खूप छान मॅनेज करतो. त्याबद्दल मी माझ्या भाग्याला मानतो आणि आमच्यातल्या प्रेमाला दाद देतो. आणि आता हे सगळे मान्य करण्याचा हा महिना, मोसम आहे... नाही का? ज्याप्रमाणे मी माझ्या चुलत भावंडांना सल्ले देतो किंवा त्यांच्याबरोबर आमचे नाते शेअर करतो तसे ते तुमच्याबरोबरही करणार आहे... खरंच कधी ना कधी ते तुमच्या उपयोगी नक्की पडेल...

१. लग्नामुळे सगळं काही बदलते असे नाही: एकदा का लग्न झाले की त्यानंतर तुम्ही जास्त सुरक्षित, जबाबदार आणि आश्वासन पाळणारे बनता अशातला भाग नाही. तुम्ही सदैव प्रेमात आकंठ बुडलेले असता असेही काही नाही. दोन प्रेम करणारे किंवा एकमेकांवर प्रेम करायच्या बेतात असलेले दोन जीव एकत्र येऊन एक घोषणा करतात, बाकी काही नाही. मग त्या दोघांनी लग्नाचं नातं लोणच्यासारखे मुरवायचे असते. लग्न तुमच्यासाठी काही करत नसते, ते झाल्यावर तुम्ही लग्न टिकावं म्हणून प्रयत्न करायचे असतात. तुमचे लग्न झाले म्हणून तुम्ही एकमेकांबरोबर काही अतिरिक्त अपेक्षा ठेवता कामा नयेत. तेउहा आपले लग्न झालेच नाही अशा थाटात रहा. आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात रहा... मैत्रीच्या बंधात हे नातं जपा आणि ते चिरंतन ताजे राहिल...

२. तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीचे लग्न म्हणजे तुमच्या स्वत:चेही ठरू शकते: अर्थात मी तुम्हाला तुमच्या समाजात किंवा तुमच्या जिवलग मित्र-मैत्रिणीशी लग्नगाठ बांधायला सुचवत नाहीये. मी सांगतोय की, तुम्ही आणि तुमच्या जोडीदारात एक छान मैत्रीपूर्ण नाते निर्माण होऊ शकते. त्यात रोमान्स आणि शरीर ओढ क्षणभंगूर असेल. पण जरी त्यात उन्हाळा आला किंवा कडाक्याचा हिवाळा तरी आपल्या जोडीदाराच्या सहवासाने सुसह्य वाटायला हवा. हे नातं म्हणजे उन्हाळयात येणारी थंड वाऱ्याची झुळुक आणि कडाक्याच्या थंडीत जाणवणारी ऊब... आणि हे सगळं जीवाभावाच्या मैत्रीत असतंच... तुमच्या मागे खंबीरपणे उभं राहणारं स्वत:चं असं कुणीतरी... कोणत्याही प्रकारची शिरजोरी नाही, निर्णयांचं ओझं नको...जर तुमचा जोडीदार कुणा दुसऱ्या उयक्तीचा बेस्ट फ्रेंड असलेला/असलेली तुम्हाला आवडणारही नाही. जेव्हा तुम्ही दोघं म्हातारे उहाल तेउहा दोघांच्या मनात असलेले प्रेम आजच्यासारखे ताजं असेल. एकत्र सूर्यास्त बघत चहा पित मनसोक्त गप्पा मारताना ते प्रेम जाणवत राहींल.. खोलवर...

३. ईस्ट इंडिया कंपनी सिंड्रॉमपासून सावधान... : लग्नानंतर जोडीदार संरजामशहा किंवा वसाहतवादी बनू पाहतो. मी स्वत: एक पती आहे. आता तुमची पत्नी तुम्हाला म्हणेल की आज रात्री मी पलंगाच्या याच बाजूला झोपेन. तुम्ही नवख्या बायकोचे चोचले पुरवालच. तिला हवा असलेल्या बाजूला झोपायलाही द्याल. पण तुम्हाला सांगतो, हे प्रकरण अंगाशी येईल. कारण जेव्हा मध्यरात्री तुम्ही पाणी पिण्यासाठी किंवा अन्य कारणांसाठी उठाल आणि परत बेडवर याल तेव्हा ती ढाराढूर अवस्थेत बिछान्याच्या मध्यभागी झोपलेली दिसेल. मग तुम्ही गरीब बिचारे पलंगाच्या टोकावर कसेबसे झोपण्याचा प्रयत्न कराल. तुमची अवस्था लगोलग भरलेल्या ट्रकमधल्या उसासारखी झालेली असेल. त्यावर कडी म्हणजे जेउहा सकाळी तुम्ही कार्यालय गाठाल, तेउहा सगळेच तुमच्याकडे बघून गालात हसत असल्याचे जाणवेल. तुमच्या झोपेअभावी लाल झालेल्या डोळ्यांचे वेगळेच अर्थ लावले जातील. मग सहकारी उगाच मस्करी करतील. कान ओढतील...आणि म्हणतील, रात्री झोप लागली नाही वाटतं.. तू तर गेलास कामातून... अर्थात ही बाब नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या बाबतीत घडतच असते. पण रात्री पलंगाच्या टोकावर तुम्ही झोपले असता त्यामुळे हा बुक्क्यांचा मार सहन करण्यावाचून आणि दात दाखवण्यािशवाय पर्याय नसतो... जोडीदाराला आपण अशाप्रकारे अनेकदा आपली स्पेस वापरायला देत असतो. कारण असलेले प्रेम, एकमेकांवरचा विश्वास.. आपण हा समजूतदारपणा प्रत्येक नात्यात नाही दाखवत... जर हा घटक कमी पडला तर मात्र नात्यांची गणितं बदलतात. मैत्रीत त्रास सहन करावा लागतो. जर कोणतीही समस्या असेल तर लगेच त्याचे निरसन करा... तुम्ही चांगले मित्र आहात हे लक्षात असू द्या...

४. शेवटचा सल्ला, पण तितकाच महत्त्वाचा: तुम्ही ऐकलं असेल की लग्न हा एक भयंकर विनोदि आहे... स्त्री आणि पुरुष जेव्हा एकत्र येतात तेव्हा दोन वेगळे ताल एक होणं असतं.. दोघांच्या शरीराची लय वेगळी असते. जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा पावसाच्या सरींचा निनाद होतो किंवा नदीचा खळखळाट तरी गुंजतो... हा जीवन रव कायम टिकवला की नाते टिकते... तुम्हाला एकमेकांशिवाय करमत नाही... बेडरूममधली आव्हाने रोचक वाटायला लागतात. पण या नात्यात भावनिक, मानसिक समंजसपणा असायला हवा. त्यामुळे समजूतदारपणा, संयम आणि पॅशन हे की-वर्ड लक्षात ठेवा. आधी समजूतदारपणा यायला हवा, मग सावकाश संयम येईल. या दोघांचा तोल सांभाळत आपल्या जोडीदारात असलेली पॅशन विझू देऊ नका...
हे या वषयावरिचे माझे शेवटचे शब्द नाहीत. पण तुम्ही पाण्यात पडल्यावर पोहायला स्वत:च शिकायला हवे. पण मला वाटतं की या कागदावरच्या शब्दांनीही त्यांची जबाबदारी निभावली आहे... तेव्हा प्रेमात रहा.. एकत्र जगा... गॉड ब्लेस!!

आंतरजालावरून साभार - द संडे इंडियन ( लेखक - प्रशान्तो बॅनर्जी )


टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top