स्वप्नातली तू परी
अलवारशी बासरी
तुझ्यात सप्तसूर माझे
झुरे निशा बावरी
सये निशा अशी दिवाणी
मिठीत स्वप्न जागतो मी
मधाळ वेळ मिलनाची
मधाळ चंद्र चोर तो मी
अधरे जुळली या मिठीत मावली
स्वप्नातली तू परी...
गुलाबी स्वप्न कोवळेसे
गुलाबी रंग या कळीचे
अधीर श्वास शोधता हे
गुलाबी गंध ओळखीचे
फुलला हलवा हा गुलाब अंतरी
स्वप्नातली तू परी...
तुझेच स्वप्न पाहतांना
तुला तुलाच शोधताना
प्रिये तुझाच भास आहे
कवेत रात्र ओढताना
बघ ना वळूनी चांदणीही लाजली
स्वप्नातली तू परी...
चित्रपट - सतरंगी रे
दिग्दर्शक - आदित्य सरपोतदार
कलाकार - आदिनाथ कोठारे, अमृता खानविलकर, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, भूषण प्रधान, सौमिल शृंगारपूरे, उदय टिकेकर, विद्याधर जोशी, सुप्रिया मतकरी
संगीतकार - अजय नाईक
गीतकार - अंबरीश देशपांडे
वर्ष - २०१२
Post a Comment Blogger Facebook