1.पिटुकला पाहुणा!!
पिटुकला पाहुणा!!
काल रात्री आमच्या घरी,
उंदीर आला छोटा,
त्याला पाहून आमचा उडाला,
गोंधळ केवढा मोठा!
छोटा होता चपळ फार,
धावे इकडून तिकडे,
आम्ही त्याला घाबरत होतो,
तो ही आम्हाला घाबरे,
हळूच तोंड बाहेर काढून,
नाक उडवीत होता,
त्याला कोणी पाहत नाही
याची खात्री करून घेत होता,
तो दिसताच पळवुन लावायला,
मी झाडू घेउन थांबले,
बाहेर येताच पिटुकला,
मीच घाबरून पळाले.
रात्रीपासूनआम्ही त्याच्या,
मागे पळत होतो,
त्याच्यापेक्षा आम्हीच जास्त
उडया मारत होतो.
छोटा होता मस्तीखोर,
त्याने नाना करामती केल्या,
एवढ्याशा उंदराने सार्या
घराला वेठीस धरले.
पिटुकला होता गोंडस फार,
आम्हाला जाम हसवले.
बाबाही आमचे आहेत धीट,
त्याला बरोबर बाहेर काढले.
2.अटक मटक
अटक मटक चवळी चटक
चवळी लागली गोड गोड
जिभेला आला फोड फोड
जिभेचा फोड फुटेना
घरचा पाहुणा उठेना
जिभेचा फोड फुटला
घराचा पाहुणा उठला !!
3.अडगुलं मडगुलं
सोन्याचं कड्गुल
रुप्याचा वाळा
तान्ह्या बाळा
टीट लावू
4.एवढा मोठ्ठा भोपळा
आकाराने वाटोळा
त्यात बसली म्हातारी
म्हातारी गेली लेकीकडे
लेकीने केले लाडू
लाडू झाले घट्ट
म्हातारी झाली लठ्ठ..
5.येरे येरे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठ्ठा,
ये ग ये ग सरी
माझे मडके भरी
सर आली धावून
मडके गेले वाहून
6.चांदोबा चांदोबा भागलास का
निंबोणीच्याझाडामागे लपलास का
निम्बोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
मामाच्या वाड्यात येऊन जा
तूप रोटी खावून जा
तुपात पडली माशी
चांदोबा राहिला उपाशी
7.एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ..!
तिकडून आली बस...
बसमध्ये बसलं,
तिकीट नाही काढलं....
तिकीटचेकरने पाहीलं,
चिमटीत धरून फ़ेकलं.....!!!
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Sasa Sasa Disto kasa
ReplyDeleteKapus pinjun thevlay jasa
Lal, Lal doley barik chaan
Lahaan sheput motthe Kaan
lala khaun fugato tum
Chahul lataach palto dhum