ढग दाटुनी येतात
मन वाहुनी नेतात ||२
ऋतू पावसाळी सोळा
थेंब होऊनी गातात
झिम्माड पाण्याची
अल्लड गाण्याची ||२
सर येते........ माझ्यात..... !!!
माती लेउनिया गंध
होत जाते धुंद धुंद
तिच्या अंतरात खोल अंकुरतो
एक बंध बंध
मूळे हरखून जातात
झाडे पाउस होतात
ऋतू पावसाळी सोळा
थेंब होऊनी गातात
झिम्माड पाण्याची
अल्लड गाण्याची ||२
सर येते........ माझ्यात ..... !!!
जीव होतो ओलाचिंब
घेतो पाखराचे पंख
सार्या आभाळाला देतो
एक ओलसर रंग रंग रंग
शब्द भिजुनी जातात
झिम्माड पाण्याची
अल्लड गाण्याची ||२
सर येते........ माझ्यात ..... !!!
गायक/गायिका: साधना सरगम
संगीतकार: अशोक पत्की
गीतकार: सौमित्र
Post a Comment Blogger Facebook