५ जून २०११ ...विनायक चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर पुण्यातील सारसबागेतील गणपतीच्या आशीर्वादाने पुणेकरांना भेटायचं ठरलं 

आणि आम्ही सकाळी पुण्याला जायला सज्ज झालो 

प्रथमेश ने गाडीसाठी मेहनतीने बनवलेला मन माझेचा फलक उठून दिसत होता


प्रवास सुखरूप होवो अशी अमित ने नारळ फोडून प्रार्थना केली आणि आम्ही पुणे प्रवास सुरु केला 


मस्तीमस्करी करत आमचा प्रवास सुरु झाला ........

रस्त्यात मध्ये थांबून स्वातीने आणलेला गरम गरम  छान कांदेपोहे चा नाश्ता केला ..धन्यवाद स्वाती !

 
खंडाळ्याच्या घाटातून आणि छान वातावरणातून आम्ही पुण्याकडे कूच केली
पुण्यातील रस्त्यांचे कोडे सोडवत सोडवत शेवटी एकदाचे आम्ही सारसबागेत पोहोचलो 

पुणेकर आमची वाट पाहतच होते ,,आणि पाहता पाहता ग्रुप वाढतच गेला 

सारसबागेतील मंगलमुर्ती गणेशाच दर्शन घेण्यास आम्ही निघालो 

छोटीशी मूर्ती असूनही खूप  प्रसन्नता देवून जाणारे रूप आहे सारसबाग गणपतीचे ... 


तिथे दर्शन घेवून ..सारसबागेतील रम्य परिसराचा आनंद लुटला 

थोड्या गप्पा मस्करी करून ..मग दगडू शेठ  ला जाण्यास निघालो 

पुण्याला येवून दगडू शेठ गणपतीचे दर्शन नाही घेतले तर प्रत्येकालाच चुकल्यासारखे वाटणारच..

म्हणून दगडू शेठ गणपतीचे आवर्जून दर्शन घेतले ..गणेश मुख पाहूनच मन भारावून गेले 

तिथून मग थोडासा अल्पोपहार केला ....पुणेरी मिसळ चाखण्याची सर्वांचीच इच्छा होती 

कधी एकदाची मिसळ येते आणि आम्ही खायला तुटून पडतोय अस झालेलं 

संध्याकाळ होत आलेली आणि पुणेकरांनी छान सल्ला दिला कि जाता जाता वाटेतच चतुश्रुंगी देवीच मंदिर आहे
मग काय आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला आणि सोबत पुणेकर त्याच्या बाईक घेवून आमची सोबत करत होते 

डोंगरावरील ..विशाल आणि भव्य मंदिराच्या पायथ्याशी आम्ही पोहोचलो 

चतुश्रुंगी देवीचे दर्शन घेतले आणि मग थोड्या वेळाने मुंबईकडे जाण्यासाठी निघालो
पुणेकरांचे खरच लाख लाख आभार ज्यांनी एक्सप्रेस हायवे पर्यंत साथ दिली आणि पुन्हा भेटण्याच्या आश्वासनाने आम्ही पुणे सोडलं ..
पुणेकरांनी खूप वेळ दिला ..आमचा त्रास सुद्धा सहन केला आणि आम्हाला जी सोबत दिली ..मैत्री निभावली ति आयुष्यभर अशीच सोबत राहो हीच बाप्पा कडे प्रार्थना !!!

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top