तुझ्या मुलेच तर माझ्या कवितेला जोड आहे,
म्हणूनच कि काय मला तुम्हा दोघींची इतकी ओढ आहे.
खर तर तू आणि कविता दोघी एकाच माळेचे मणी,
विसरू नाही देत मला तुम्ही दोघीही जणी.
तूच आहेस कविता माझी, अन कवितेतही तूच असतेस,
तू जवळ नसतेस तेव्हा तीच जवळ येऊन बसते.
अशाच घट्ट राहू देत तुमच्या प्रेमळ भेटी गाठी,
तू माझ्या कविते बरोबर अन मी तुम्हा दोघांसाठी.
माझ्यावर कविता नको करूस असे देखील बोलतेस तू,
कवितेत येऊन माझ्या प्रेमाचे सारे राज खोलतेस तू.
कितीही नाही बोललीस तरी माझ्या कवितेला माहित आहे,
अखेर माझ्या सोबत तीही तुझीच वाट पाहीत आहे.
श्वास आहे ती माझा म्हणूनच कविता करून जगतो,
काही नको मला देवाकडे, सार तुझ्याच साठी मागतो.
साभार -कवी: विशाल गावडे.

टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा