कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छ्या.. 


 आश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी रात्री इंद्राची पूजा करतात. पूजेनंतर रात्री चंद्राला आटीव दूधाचा नैवेद्य दाखवायचा असतो. मध्यरात्री लक्ष्मी चंद्रमंडळातून पृथ्वी वर उतरते व `को जागर्ति'? कोण जागं आहे? असा प्रश्न विचारते जो जागा असेल त्याला जी धनधान्य देते. यावरून कोजागिरी पौर्णिमा असे नांव पडले.

आश्विन महिन्यात पावसाळा संपतो. त्यामुळे आकाश निरभ्र असते व स्वच्छ चांदण असते अशा चांदण्यारात्री इष्टमित्रांसह मौजमजा करण्याच्या दृष्टीने हा उत्सव साजरा करतात. राजस्थान मध्ये स्त्रिया या दिवशी शुभ्र वस्त्र धारण करून चांदीचे अलंकार घालण्याची प्रथा आहे.


आज रात कोजागिरी,
गेली सांगून काहीतरी..

आज मी धुंद,
माझ्यातच बेधुंद,
गीत प्रितीचे ओठावरी,
जणू एक मर्मबंध..
अनुभवता हे सारे
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..

पदर माझा चमचमता,
त्यावर चांदण्यांचा गलका,
पाहून या मनकवड्या वेडीला,
चंद्रही होतो बोलका..
छेडीता अल्लड सुर हे सारे..
आज रात कोजागिरी
गेली सांगून काहीतरी..

तू मला पाहूनी
वेडावशील त्या तिथे,
हाती हात धरून सखीचा,
धावशील माझी अंतरे..

स्वप्न तुझे हे 
गुलाबी होईल खरे..
आज रात कोजागिरी
गेली सांगुन काहितरी..

मला पाहशील तू
डोळ्यात सखीच्या,
जाग्या होतील स्पर्शरेषा,
एका नाजूक भितीच्या..

तिला अर्थ मिठीचे 
समजावून सांग रे..
अशी आज रात कोजागिती,
गेली सांगुन काहितरी.... 

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

 

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top