पाऊसात चिम्ब कधी भिजावस वाटते,
मोकळ्या हातानी पाण्याला स्पर्श करावेसे वाटते..
वार्याची झूळुक त्यावेळी हळूच भासते,
लाजून नजर माझी तेव्हा हळूच झुकते..
तुझी सावली माझ्या भोवती दिसते,
खांद्यावर डोक तुझ्या ठेवावेसे वाटते..
हृदयाचे ठोके माझ्या त्यावेळी वाढते,
घाबरून पाऊल माझे तिथेच थांबते..
त्यावेळी तू पुढे यावा असे वाटते,
तुझी सावली पण साथ तेव्हा सोडून जाते..
अश्रूधारा माझी पाऊसात वाहून जाते,
तुला न कळवता मी ते लपवून घेते..
जाणीव तुला होणार कधी याची मला खात्री वाटते,
वेळ कधी येणार याची मी वाट पाहते..!
साभार आणि कवियेत्री
रुची
Post a Comment Blogger Facebook