प्रस्तावना : १ एप्रिल म्हणजे आपल्या प्रियजनांच्या खोड्या काढून त्यांना फसवून 'एप्रिल
फूल'बनवण्याचा हक्काचा दिवस.माझ्या 'नक्की कोण तू माझा'या कवितेच्या नायिकेला पडलेल्या
प्रश्नाचे उत्तर ती ह्याच 'एप्रिल फूल'चा आधार घेउन शोधायचे ठरवते.१ एप्रिल ला त्याला मनातले
खरे सांगून तो जर म्हंटला की आपण फक्त दोस्तच आहोत तर त्याला 'एप्रिल फूल'म्हणून ही
दोस्ती कायम ठेवावी पण जर त्याच्याही मनात प्रेम असेल तर सर्व प्रश्न मिटतील ह्या उद्देशाने
नायिका त्याला खरे सांगते..त्याच्यावर ही कविता..

 
** मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले **

'नक्की कोण तू माझा' प्रश्नाचा मी निकाल लावायचे ठरवले,
निकालाचा दिवस 'एक एप्रिल' ला निवडले,
प्रेमपत्र त्याच्या हातात दिले,
नजर त्याची झाली कावरीबावरी,
वाटलं हिची लग्नपत्रिकाच..हातात पडली..

त्याच्या चेह-यावरचे भाव वाचत होते,
माझ्या उतराच्या मी जवळ जात होत्ते,
आनंदाने तो बोलला,माझ्या मनातले बोललीस,
तुला विचारायची इच्छा होती पण नकाराने,
दोस्ती तुटु नये हीच काळजी होती..

विचार केला, विमान याचे खाली आणूया,
म्हटले त्याला, अरे वेडया, 'एप्रिल फूल' केले तुला,
दोस्तीत आपल्या प्रेम बिम आणाच कशाला,
उसने हसु आणत कसाबसा बिचारा बोलला,
'जातो,उशीर झालाय'..म्हणत त्याने रस्ता धरला..

डोळे भरले होते त्याचे,मी ही काही क्रूर नव्हते,
धावत त्याला थांबवले,परत 'एप्रिल फूल' बोलले,
माझ्या डोळ्यांतले भाव त्याने ऒळखले,
'एक एप्रिल'ने मैत्रीत प्रेमाचे धागे गुंफले,
'नक्की कोण आम्ही एकमेकांचे' ह्या प्रश्नाचे उत्तर दिले..




टिप्पणी पोस्ट करा Blogger

Emoticon
:) :)) ;(( :-) =)) ;( ;-( :d :-d @-) :p :o :>) (o) [-( :-? (p) :-s (m) 8-) :-t :-b b-( :-# =p~ $-) (b) (f) x-) (k) (h) (c) cheer
Click to see the code!
To insert emoticon you must added at least one space before the code.

 
Top