हक्क माझ्या स्वप्नांवरचा

फक्त तुलाच, इतरांना नाही

पण जरा झोपू दे गं मला

कालची अजून उतरली नाही.
-------------------------
तुझ्या आठवणींचा आल्बम

काल पुन्हा काढला होता

तेंव्हाच माझ्या लक्षात आलं

की चष्म्याचा नंबर वाढला होता
-------------------------------
वैशालीमध्ये कॉफी प्यायची

आजकाल मला चोरी आहे

तुझ्या आठवणी तर आहेतच

शिवाय थकलेली उधारी आहे
-------------------------------
तिचा प्रतिसाद मला कळला होता
तरी एक डाव मी मांडला होता
तिचा हात हातात घेऊन पहाण्याआधीच
गाल माझा रंगला होता ....
-----------------------------------

मिठी आणि मुठ यात
शब्दांची कसरत आहे.
ती त्याच्या मिठीत अन्
तो तिच्या मुठीत,
हिच घरोघरी रित आहे.
--------------------------------

मुल हरवल्यावर

बायका रड रड रडतात

आणि ती भेटल्यावर त्यांना

बडव बडव बडवतात,
------------------------------
तूला पत्र लिहायचं म्हणून

केवढी झालेली घाई,

आणी सुरूवात केल्यावर मात्र

नेमकी संपलेली शाई.
--------------------------------------------

मी तुला कधीही
वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास
त्या इवल्या मशीनवर मावत नाही.

----------------------------------
जडावलेल्या पापण्या
मिटायला तयार होत्या
तेव्हाच हीच्या घोरण्याच्या
सीमा पार होत होत्या
---------------------------------



Post a Comment Blogger

 
Top