फुलांची रांगोळी बनवण्याची हौस आणि त्यानंतरचे समाधान काही वेळा अल्पायुषी ठरते. फुलांच्या पाकळ्या वाळू लागतात. रांगोळी कोमेजू लागते. यासाठी ही एक आधुनिक रांगोळी करून पाहा. 

फुलांच्या पाकळ्या काढण्यापेक्षा देठांची फुले व पानांच्या चुऱ्यापेक्षा झाडावरील दोन-तीन पाने असलेले तुरे तयार ठेवा. बऱ्याचदा घरी आलेल्या बुकेचा स्पंज ठेवून दिलेला असतो. हा पाहिजे तसा कापून एखाद्या ताटावर किंवा थाळ्यात एकसमान पसरून त्याची छोटीशी गादी तयार करा. त्याला एखाद्या बारीक दोऱ्याने ताटाला बांधून घ्या म्हणजे स्पंजचे तुकडे हलणार नाहीत. या स्पंजमध्ये पाणी ओतून तो पूर्ण ओला करून घ्या.

आता फुलांची-तुऱ्यांची व पानांच्या धुमाऱ्यांची पाहिजे तेवढी देठे ठेवा आणि पाहिजे त्या रचनेप्रमाणे खोचत जा. अशी तयार रांगोळी जास्त दिवस टिकेल व फुले टवटवीतही राहतील. आवश्‍यक वाटले तर याच फुला-पानांची पुनर्ररचना करून रोज वेगवेगळी डिझाईन्स तयार करा. अशा प्रकारची रचना भिंतीवर किंवा अन्य ठिकाणीही तयार करता येईल. 





































आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

 
Top