वाळूत बसून आयुष्य जगण्यास तुला आवडतं.
उसळून येणारया लाटा 
पायावर घेउन लाजायला तुला आवडतं,
त्या समुद्रावर स्वछंद्पने फिरायला तुला आवडतं.


निवांत बसून एकमेकांच मन 
समजुन घ्यायला तुला आवडतं,
घरी परतताना तिखट-तिखट 
पानीपूरी खायला तुला आवडतं.


ह्या सर्व आठवणी हसत-हसत 
सांगायला तुला आवडतं,
हे सर्व ऐकताना 
तुझ्या चेहर्यावरचं गोड़ हसू पहायला मला आवडतं. 


साभार - कवी :प्रथमेश राउत ..............

Post a Comment Blogger

 
Top