आंबोळगड गावाला दोन सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारे लाभले आहेत. राघोबाची वाडीस लागून असणाऱ्या समुद्रकिनाऱ्यास "गोडिवणे किनारा" म्हणतात. येथे अनेक पर्यटक भेट देतात.
आंबोळगड गावात एक पडीक किनारी दुर्ग आहे. किल्यात एक तुटलेली तोफ या व्यतिरिक्त येथे काही नाही. ना तटबंदी न वाड्याचे अवशेष. आंबोळगड हा उंचवट्यावर वसवलेला किल्ला आहे. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२०० चौरस मीटर आहे. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र व उत्तर आणि पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्याची अवस्था फारच बिकट आहे. समुद्राच्या बाजूची काही तटबंदी शाबूत आहे. याशिवाय किल्ल्यात एक चौकोनी विहीर व वाड्यांची जोती आहेत. किल्ल्याजवळच्या सड्यावर गगनगिरी महाराजांचा मठ आहे. मठ समुद्र कड्यावर असून येथे समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. समोरच एक तुटलेल्या समुद्रीकडा सर्वांच्या नजर खिळवून ठेवतो. संध्याकाळी मावळत्या सूर्याचे मनमोहक दृश्य पाहून डोळ्यांचे पारणे फेटते. किल्ल्यासमोरच स्वयंभू "श्री गणेश मंदिर" असून जागृत "श्री महापुरुष देवस्थान" आहे. गणेश मंदिराच्या मागच्या बाजूस समुद्रकिनारी खडकात स्वयंभू "श्री जटेश्वर देवस्थान" आहे.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा