*आंगणेवाडी ह्यो गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण तालुक्यातल्या मसुरे या गावच्या 12 वाडींमधली एक वाडी. लयतलय 380 ते 400 कच्च्या आनि पक्क्या घरांचो ह्यो गाव मालवण या तालुक्याच्या ठिकाणापासून 12 कि.मी. अंतरावर आसा. लोकसंख्या लयतलय हजारभर. तेतुरली बरीच जना पोटापानियासाठी मुंबैक जावन रवल्यामुळे गाव तसो खालीच.गावात शाळा एकच.
असो ह्यो गाव डोंगरार वसललो. म्हणान गावात शेत जमीन नावाकव नाय.मातर आंबो, काजू, रतांबीची झाडा मातर भरपूर.
सगळी भरड जमीन. अशा या गावात भरडावर ह्या देवीचा
सुरेख संगमरवरी देऊळ आसा.
26 फेब्रुवारी 1989 या दिवशी मी पहिल्यांदाच या यात्रेक गेल्लय. त्या टायमाक ह्या देऊळ जुन्या पध्दतीचा मंगलोरी ईटी घातलला देऊळ होता.
त्यानंतर 2016 सालापर्यंत सतत
28 वर्सा मी दरवर्षी न चुकता या यात्रेक येयत रवलय.एकव खाडो नाय.
नवसाक हमखास पावणारी अशी या देवीची ख्याती आसा म्हणान दरवर्षी भाविक लाखांच्या संख्येन या यात्रेक येयत रवतत.
या गावच्या गावकऱ्यांत आंगणे आडनावाच्या लोकांची संख्या जास्त. त्यामुळे या गावाक अंगणेवाडी या नावान ओळाखतत. तेच या गावचे मानकरी.
या देवीची कोरीव किंवा घडीव मूर्ती बसवलली नाय हा. अडीच फूटभर उंचीचो एक काळ्या रंगाचो पाषाण आसा. उत्सवाच्या दिवसातच या पाषाणावर चांदीचो मुखवटो चढवन तेका जरीकाठाची भरजरी साडीचोळी नेसवतत. दागिने,मुकूट घालतत.हार , ईनी घालून सजवतत.
कितीतरी वर्सा अगोदर ह्यो पाषाण मोकळ्या माळरानात
होतो.एका ग्रामस्थानं पाळलली एक गाय प्वाटभर खाय पण घरात दूधाचो एक थेंबव देय नाय.मालकान पाळत ठेवल्यावर समाजला काय ती गाय दररोज न चुकवता या भरडावर येवन या पाषाणावर दूधाची धार सोडता. ह्या बघल्यावर मालकाक पटला ह्या काय येगळाच गणित आसा.ह्यो साधोसुदो पाषाण नाय. दिव्य पाषाण आसा. तेतुरसूनच लोकांनी ह्या मंदिर बांधल्यानी.
या देवीचा भगवती, अंबा, म्हाळसा असा कोनताव विशेष नाव नाय. माळरानावर म्हणजेच भरड जमिनीवर गावली म्हणान भराडी ह्या नावान लोका तिका ओळखाक लागली.
सगळ्यात महत्वाचा म्हणजे श्री देवी भराडी हिच्या वार्षिक उत्सवाची कोणतीव तिथी / तारीख नाय.
या देवीचा वैशिष्ट्य म्हणजे हिका रानडुकराची पारध लागता.
या दरम्यान या भागात भुईमूगाचा भरपूर पीक येता. तेच्यावर ताव मारण्यासाठी रानडुकर येतत आनि सगळ्या पीकाचो इद्वास करतत आनि हाताबोटाक इल्लल्या पीकाची नासाडी जाऊन शेतकऱ्यांचा लयच नुकसान होता. ता टाळूच्यासाठीच देवीचीच ही योजना आसतली.
असो. साधारणपणान नोव्हेंबरच्या म्हैन्यात तिसऱ्या नायतर चौथ्या आठवड्यात देवीचो कौल घेऊन जवळ बंदूकी असलले गावातले झिलगे टोळये टोळयेन रात्रीच्या टायमाक रानडुकराच्या शिकारीक चारव दिशेन भायर पडतत.शिकार कधी गावतली ता काय सांगाक येना नाय. दररोज तेच्या मागे लागत रवाचा लागता.
एखादर्या टोळीएक शिकार गावली काय ढोल/डबे वाजवन बाकीच्या टोळयांका कळवतत. मग सगळेजान येवन शिकार झाल्लल्या डुकराक जाड काठयेन बांधान उचलून मंदिरात हाडतत.
ह्यो डुकर उकलूक आठजाण लागले तर तो आठकीचो डुकर. बाराजाण लागले तर बारकीचो डुकर असा म्हणतत.
मग ती शिकार देवीच्या पुढ्यात ठेवून देवीक गाऱ्हाणा घालतत. मगे
मिळालेली शिकार शिकारी आनि गावकऱ्यांत प्रसाद म्हणून वाटून घेतत. अर्थात जेच्या बंदूकीन ही पारध झाली तेका एक वाटो अधिक गावता.
हेच्यानंतर सवड काढून एका दिवशी गावातले ग्रामस्थ, मानकरी, तलाठी,पोलीस,पोलीस पाटील आनि बाकीच्यांची बैठक बोलवतत व देवीक पुन्हा एकदा कौल लावून जत्रेची तारीख ठरवतत एकदा तारीख ठरली काय मगे कोणत्याव परिस्थितीत तेच्यात बदल करनत नाय.
शक्यतोवर फेब्रुवारी म्हैन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या नायतर चौथ्या आठवड्यात व शक्यतोवर शनिवार किंवा रविवार या दिवशी जत्रा आयोजित करुच्या साठी देवीचो कौल घेण्याचो प्रयत्न केलो जाता.
गेल्या 33 वर्षांचो जत्रेचो इतिहास बघितल्यार फक्त दोन वेळा ही जत्रा मार्च महिन्यात झाली होती असा दिसता. एकदा 1993 मधी 7 मार्च व दुसऱ्यांदा 2005 मधी 1 मार्चला ती भरली होती असा दिसता.
हेरशी देवीची खणा नारळान ओटी भरण्याचा काम वर्षभर सुरूच आसता. पण जत्रेची तारीख ठरल्यार मातर जत्रा संपन्न जायसर देवीची ओटी भरुक परवानगी देनत नाय.
हेरशी पाषाणरुपी देवीचीच पूजा अर्चा होता. पण जत्रोत्सवात मातर या पाषाणाक चांदीचो मुखवटो आनि आशिर्वाद देवच्यासाठी सोन्याचो मुलामो दिल्ललो हात बसवतत. हेच्या शिवाय देवीच्या गळ्यात मौल्यवान हार, कर्णफुला अशा साजशृंगाराबरोबरच देवीक हार आनि इणी घालून छानपैकी सजवतत.
आंगणेवाडी गावांतले प्रमुख मानकरी म्हणून आंगणे कुटुंबीयांका जत्रेच्या दिवशी देवीची ओटी भरण्याचो पहिलो मान गावता. 25-30 वरसा अगोदर जत्रेच्या दिवशी सकाळी सूर्य उगवाच्या अगोदर दर्शन आणि ओटी भरण्याचो कार्यक्रम सुरुच केलो जात नसा.. सूर्य उगवल्यार आरसो घेवन सुर्याचा किरण देवीच्या कपाळावर पाडीत. मगे देवीचो जयजयकार करीत पूजा अर्चा आनि ओटी भरण्याचो कार्यक्रम सुरु होय.
अर्थात आधीच सांगलय त्यापरमान पहिलो मान ह्यो आंगणे कुटुंबीयांकच गावा.तोपर्यंत सकाळी 6.00 वाजता इल्लले बाकीचे भाविक मातर सकाळी 8.30 ते 9.00 वाजेपर्यंत ताटकळत रांगेत उभे रवत.त्यामुळे आंगणे कुटुंबीयांचे दर्शन व ओटयो भरण्याचो काम पूर्ण झाल्यानंतरच रांगेत ताटकळत उभ्या रवलल्या सर्व सामान्य भाविकांपैकी पहिल्या भाविकाक सकाळी 9.00 नंतरच मंदिरात दर्शन मिळा. पण दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनान याबाबतीत काही वर्साअगोदर मोठो निर्णय घेतल्यान आनि देवीचो कौल घेवन जत्रेच्या आदल्या रात्री 00.00 वाजल्यापासूनच दर्शन व ओटी भरण्याचो कार्यक्रम सुरु करुची प्रथा सुरु केल्यानी. पण तरीही गर्दी म्हणण्या इतकी काय कमी जावकं नाय.
या देवीची ओटी भरुच्यासाठी तांदूळ, नारळ,साडी नायतर खण, हेंच्या बरोबरच ईणी ,हळद-कुंकू या रोजच्या पवित्र वस्तूं बरोबरच सोन्याच्या कणाचो अंश असलेला लेणा देवीक अर्पण करतत. .ग्रामीण भाषेत हेका "लाना" या नावान ओळाखतत. . लाल नायतर सफेद रंगाच्या पातळ पतंगाच्या कागदात ह्या लाना पॅक करुन 5 नायतर 10 रुपयाक इकतत .या लान्याशिवाय ओटी अपूर्ण समाजली जाता
देवीचे नवस फेडण्याचे बरेच प्रकार आसत.
त्यापैकी एक म्हणजे लहान मुलांचा जावळ अर्पण करणा. मंदिराच्या एका कोपर्यात हेची उत्तम सोय केलेली असता.
दुसरो प्रकार म्हणजे तुला भार लहान मूल आसांदे, मध्यमवयीन माणूस आसांदे नायतर म्हातारो बापयो आसांदे नायतर बायलमाणूस आसांदे जेच्या नावान तुलाभाराचो नवस केल्ललो आसता तेका नवस फेडण्यासाठी देवळाच्या मागच्या बाजूला जावचा लागता. थैसर लाकडाच्या वखारीत आसता तसो मोठो तराजू लावललो आसता. जेच्या नावानं नवस केल्ललो आसता तेका एका पारड्यात बसवतत मगे दुसर्या पारड्यात त्याच्या वजनाइतके नारळ भरतत. वजनाइतके नारळ झाल्यार ते देवीक अर्पण करतत.
तिसरो प्रकार म्हणजे देवीक सांगायचा माझा अमक्या अमक्या एक काम कर मगे पुढच्या वर्साच्या जत्रेत मी दिवसभर कडक उपास करीन आणि जत्रेच्या रात्री देवळात महानैवेद्य देखवल्यावर तो जेवा भायेर उभ्या रवलल्या लोकांकडे फेकतत तेव्हा तो झेलून खाईन आणि माझो उपास सोडीन.
जत्रेच्या दिवशी देवीच्या नावान दिवसभर कडक उपास करुन गावतली सवाशीण बायका तोंडातसून एकव सबूद न बोलता मूक्या र्हवान देवीसाठी उत्तम जेवाण बनवतत. हेतूर माहेरवाशीणींचो मान मोठो आसता. मगे रात्री देवळात देवीक पंचपक्वान्नांचो नैवेद्य देखवल्यावर देवळा बाहेर उभ्या असलल्या भाविकांच्या दिशेन तो प्रसाद उडैत जातत. ह्यो प्रसाद झेलूच्यासाठी गर्दीतील लोका जीवाच्या आकांतान प्रयत्न करतत. तेच्या साठी आपले दोनव हात वर करून पगळतत नायतर खिशातलो रुमाल, टाॅवेल नायतर काय हाताक गावात तो कपडो घेवन प्रयत्न करतत. तरीदेखुल हातात एक तरी शित पडात हेची खातरी नसता. काही लोकांच्या नकळत ही शिता तेंच्या डोक्यावयल्या केसात जावन पडतत.अर्थात हेचा तेंका भानव नसता.पण तेच्या बाजूक नायतर पाठी उभ्या रवलल्या भाविकाची नजार कावळ्यासारखी त्या शितावर पडता. मगे तो माणूस ता शित स्वतःच्या हातान काढून आपल्या तोंडात टाकता आणि आपलो स्वताचो नवस फेडून मोकळो होता. जेच्या डोक्यावर ता शित पडता तो मातर उपाशीच र्हवता. मगे स्वतःचोच नवस फेडूच्यासाठी तेका कधी कधी पुढच्या वर्षीच्या जत्रेतागायत वाट बघूची लागा. ह्यो प्रसाद झेलण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी होऊन काही भाविक नाहक जखमी देखूल होयत. तसाच हेतुर देवीक अर्पण केल्लल्या अन्नाचो प्रसाद नकळत गर्दीतल्या भाविकांच्या पायाखाली येऊन त्या प्रसादाचा पावित्र्यच नष्ट होऊची भिती आसायची ता येगळाच. शिवाय बायकांच्या अंगावयले दागिने हिसकावचे, तसाच विनयभंगाचे प्रयत्न करणा, पाकीटमारी करणा अशे बरेच गोष्टी घडण्याची शक्यता आसता.या सगळा बंद करुच्यासाठी मंदिर प्रशासनान एक उत्तम धाडसी निर्णय घेऊन गेल्या काही वर्सांपासून अशारितीन प्रसाद उडैत जावची ही प्रथाच बंद केल्यानी. .
पूर्वी ही जत्रा दीड दिवस असायची. पहिल्या दिवशी पूर्ण एक दिवस व दुसर्या दिवशी अर्धो दिवस म्हणजे दुपारी 12 .00 वाजेपर्यात असायची.
पण जत्रेची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन ही जत्रा आता दुसर्या दिवशीव पूर्ण दिवस भरवतत.
या जत्रेचा आणखी याक वैशिष्ट्य म्हणजे त्या रात्री देवीच्या देवळातलो नैवेद्य पूर्ण झाल्यावर आंगणे
वाडीतील जवळ जवळ प्रत्येक ग्रामस्थ आपल्या घरात काळ्या वाटाण्याचा झणझणीत सांबार आनि काही पक्वान्नांसकट लज्जतदार जेवाण बनवन यात्रेतील भाविकांका आग्रहाने जेवक येवचा आनि प्वाटभर जेवण्याचो आग्रह करीत आसता.. मग तो भाविक तेच्या ओळखीचो आसांदे नायतर नसांदे.
जत्रेत गर्दी लयच आसता म्हणून बरोबर हाडलली ल्हान ल्हान पोरा हरवाची , दागिने, पैशाची पाकिटे चोरीक जावची भिती आसता. म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याशिवाय गत्यंतर नाय.
या जत्रेत शेकड्यानी दुकाना आणि हाटला लावतत. या हाटलातल्या गरमागरम बटाटेवडे आणि कुरकुरीत कांदा भजी यांच्या वासानेच भूक चाळवली गेली नाही तरच नवाल. जत्रेतली मालवणी खाजा , तुपात तयार केल्लल्या पिवळ्या धम्मक घीवरआणि पांढऱ्या सुतरफेणीची दुकाना बघूची मजा काय इच्यारूकच नको.
. हेच्याशिवाय शेतीची सामाना, घरगुती वापराचे वस्तू इकूक इल्लले फेरीवाले आपली दुकाने लावन जत्रेक शोभा आणतत.
26 फेब्रुवारी 1989 या दिवशी आंगणेवाडीच्या जत्रेत मी खरेदी केल्ललो शेवये बनवचो लाकडी साचो (शेवगो) माझ्या पहिल्याच आंगणेवाडी जत्रेची आठवण म्हणून मी अजून जपान ठेवलय .बर्याचदा या शेवग्यावर तयार केल्लल्या तांदूळच्या आणि नाचणीच्या शेवयांचो आम्ही नारळाच्या रसाबरोबर आस्वाद घेतलव.
ही भराडीमाता नवसाक पावणारी देवता म्हणून सुप्रसिद्ध आसा. म्हणूनच दरवर्षी तिच्या भाविकांच्या संख्येत वाढच होता हा. तेतुर भाविकांशिवाय केवळ मौज मजा करुच्यासाठी इल्लले हवशे गवशे नवशे हेंची संख्याव वाढता हा. आंगणेवाडी जत्रेक जावचा म्हणजे फक्त मौज मजा करुक जावचा हीच त्या लोकांची भावना आसता. तेच्यामुळे या स्थानाचा पावित्र्यच धोक्यात येवची शक्यता असता.
आता ही भाविकांची संख्या आठ ते दहा लाखांपर्यंत गेली हा. पण प्रत्यक्ष आंगणेवाडी गावात रवन्यासाठी खास हाॅटलची सुविधा नाय. म्हणान गैरसोय होणा स्वाभाविक आसा. तरीदेखील कोणत्याव परिस्थितीशत जुळवून घेवची तयारी असलल्या भाविकांनी विनंती केल्यार आपल्या घराच्या खळ्यात हथरुण पसरुन आसरो घेवची, बावडेर न्हाऊची परवानगी काही ग्रामस्थ नक्कीच देतत तेव्हा एका भावगीतातील कोकणची माणसं साधी भोळी काळजात यांच्या भरली शहाळी या ओळींची आठवण झाल्याशिवाय रवत नाही.
सहाजिकच यात्रेच्या दरम्यान पोलीसांच्या बरोबरीने नाय म्हटला तरी थोडी जास्तच नोकरी एस् .टी. महामंडळाचे बस चालक आणि वाहक हेंची होयत आसता या मातर खरा हा. या दीड दिवसात एस्.टी.च्या प्रत्येक मार्गावर जादा बसेस बसेस सोडून लाखो प्रवाशांका तेंच्या तेंच्या गावातसून आंगणेवाडीक हाडून परत तेंच्या गावात नेऊन सोडूची जबाबदारी ते आनंदान पार पाडतत..यामुळे महामंडळाक या दीड दिवसात जास्तीत जास्त उत्पन्न गावता..
या काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्याची फार मोठी जबाबदारी स्थानिक प्रशासन , स्वयंसेवक व मालवण पोलीस ठाणे यांच्यावर पडत असता.तेचो फार मोठो ताण शब्दात वर्णन करणा कठीणच आसा.
देवी भराडी मातेचे शुभाशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच तिच्या चरणी प्रार्थना
जुना कौलारु देऊळ,लाकडी शेवगो, तेच्यावर तयार केल्लले तांदूळ आणि नाचण्याचे शेवये,नवीन देऊळ,महाप्रसादाची ताटा घेवन तयारीत र्हवलली सवाष्णी आणि इतर फोटो या लेखासोबत सादर करताना माका मनापासून आनंद होता हा.
लेखक:श्री. रवींद्र पाटकर,
सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा