एकदा एक अंक तज्ञ व्यक्ति अंकांचे प्रयोग करीत बसला होता. १ ते ९ दरम्यानचे सर्व अंक एकमेकांच्या बाजूला उभे होते. त्याला शून्य कुठे दिसला नाही म्हणुन त्याने एकाला विचारले की शून्य कुठे गेला दिसत नाही आहे आज.....?? एकाने रागात येवून उत्तर दिले.....तो कशाला पाहिजे तुला, त्याला काही किम्मत आहे का....?? शुन्यातून शून्य वजा होत नाही की मिळवता येत नाही. ना गुणाकार होतो ना भागाकार होतो मग कशाला हवा तो आमच्यामध्ये.....??
हे ऐकून अंक तज्ञ चिडला......त्याला राग आला. तो म्हणाला शुन्याचा शोध मानवानेच लावला आहे कारण त्याच्या शिवाय पूर्ण असा कोणी नाही......हे ऐकून सारे अंक हसू लागले. अंक तज्ञ शुन्याचा शोध घेवू लागला तेंव्हा त्याला शून्य एका कोप-यात उभा असलेला दिसला. त्याने त्याला बोलावले......शून्य म्हणाला मि नाही येणार हे सगळे मला त्यांच्यामध्ये खेळायला घेत नाहित. मला एकट्याला सगळे त्रास देत असतात म्हणतात तुला काहीच किम्मत नाहीए.....
हे ऐकून अंक तज्ञाला दुःख झाले.......तो म्हणाला इकडे असा जवळ ये.......कोण तुला म्हणाला की तुला काहीच किम्मत नाहीए.......शून्य उदगारला......हा एक म्हणत असतो सारखा. अंक तज्ञ म्हणाला की ठीक आहे, त्याने सर्व अंकांना मागे उभे रहायला सांगितले आणि एक ला पुढे बोलावले. एक पुढे आला आत्ता शुन्याला त्याच्या डाव्या बाजूला उभे रहायला सांगितले. शून्य घाबरत घाबरत उभा राहिला......०१ अशी स्थिति होती.....सगळे हसायला लागले. शुन्यामुळे एकाची किम्मत काही कमी झाली नाही......आत्ता अंक तज्ञन्याने त्याला एकाच्या उजव्या बाजूला उभे राहण्यास सांगितले......१० अशी स्थिति होती......परत सगळे हसायला लागले. अंक तज्ञ म्हणाला हसू नका......शुन्यामुळे आत्ता एकाची किम्मत वाढली आहे. या स्थितीला आत्ता दहा म्हणतात. एकावर जसे शून्य वाढत जातील तशी त्या एकाची किम्मत वाढत जाईल......मग आत्ता सांगा जरी शुन्याला स्वतःची किम्मत नसली तरी तो त्याच्यामुळे दुसा-यांची किम्मत वाढवतो, मग त्याला आपणच किम्मत द्यायला हावी की नको...... अंक तज्ञन्याचे हे बोलने समजून घेवून सर्व अंकांनी विचार करायला सुरुवात केली तेंव्हा त्यांच्या असे लक्षात आले की शून्य जर आपल्या उजव्या बाजूला येवून उभा राहिला तर आपली किम्मत इतरांपेक्षा वाढते, असे समजताच सर्व अंकांनी शुन्याला आपल्या उजव्या बाजूला उभे राहण्याचा आग्रह धरला आणि आपापसात वाद घालू लागले.........
शून्य आपला आनंदात होता......की कधीही न बोलावणारे आज मला मित्र बनवून बाजुला उभे रहायला बोलावू लागले आहेत. त्याने अंक तज्ञाचे आभार मानले.....तेंव्हा अंक तज्ञ म्हणाला की हे बघ जगात सर्वांनाच स्वतःची किम्मत कधी ओळखता येत नाही, दु-यांनी ती पटवून दिली की त्याला समजते की आपली किम्मत किती महत्वाची आहे ते. तू आत्ता कधीही स्वतःला कमी लेखु नकोस.......लोक कितीही काहीही म्हणाले की तू शून्य आहेस तरी तू संपूर्ण आहेस हे लक्षात ठेव.
आंतरजालावरून साभार - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा