गोवर्धन पर्वताला पर्वताचा राजा म्हटले जाते. कारण श्री कृष्णच्या वेळेची एकमात्र निशाणी राहिली आहे. गोवर्धनाला भगवान श्री कृष्णाचे ही स्वरूप मानले जाते आणि याच्या स्वरूपात गोवर्धन पूजेच्या दिवशी यांची पूजा केली जाते. गर्ग संहिते मध्ये गोवर्धनाचे महत्व दर्शवणाऱ्या श्लोकनुसार म्हटले गेले आहे की, “गोवर्धन पर्वताचा राजा आणि भगवान हरीचा प्रिय आहे. पृथ्वी आणि स्वर्गात याच्या समान दुसरे कुठले ही तीर्थ नाही.”
गोवर्धन पूजा विधी
गोवर्धन पूजा सकाळी किंवा संध्याकाळी केली जाते.
या दिवशी शेणाचा गोवर्धन पर्वत बनवून त्याला फुलांनी सजवले जाते.
पूजेत गोवर्धनावर धूप, दीप, नैवेद्य, फळ, जल, इत्यादी अर्पित केले जातात .या दिवशी गाय, बैल आणि शेती कामात येणाऱ्या पशूंची ही पूजा केली जाते.
पूजेनंतर गोवर्धनाची सात वेळा परिक्रमा केली जाते .
परिक्रमा करतांना पाण्याने भरलेला कलश घेतला जातो आणि थोडे पाणी टाकून ही परिक्रमा पूर्ण केली जाते.
गोवर्धन पूजा केल्याने घरात धनाची वृद्धी आणि संतान प्राप्ती होते. गोवर्धन पूजेच्या दिवशी भगवान विश्वकर्माची पण पूजा केली जाते. या दिवशी कारखाने किंवा मशीनची ही पूजा करतात.
या दिवशी संध्याकाळी दैत्यराज बळी चे ही पूजन केले जाते.
गोवर्धन पूजा व्रत कथा
विष्णू पुराणात गोवर्धन पूजेचे महत्व सांगितले आहे. देवराज इंद्राला आपल्या शक्तींवर गर्व झाला तेव्हा भगवान श्री कृष्णाने इंद्र देवाचा अहंकार दूर करण्यासाठी ही लीला रचली. गोकुळात लोक वेगवेगळे पक्वान्न बनवत होते आणि आनंद साजरा करत होते. तेव्हा बाळ कृष्णाने विचारले हे सर्व काय होत आहे? लोक कोणत्या उत्सवाची तयारी करत आहे? तेव्हा यशोदा बालकृष्णाला म्हणाली की,सर्वजण इंद्र देवाची पूजा करण्याची तयारी करत आहोत.
या नंतर बाळकृष्णाने यशोदेला विचारले, आपण इंद्र देवाची पूजा का करतो? ज्यावर देवी यशोदाने त्यांना सांगितले की, देव इंद्राच्या कृपेने उत्तम पाऊस होतो ज्यामुळे शेती चांगली होते आणि आपल्या गाईंना चारा अर्थात भोजन मिळते. यशोदेची ही गोष्ट ऐकून भगवान कृष्ण लगेचच बोलले की, जर अशी गोष्ट आहे तर, आपल्याला पूजा गोवर्धन पर्वताची केली पाहिजे . कारण आपल्या गाई गोवर्धन पर्वतावर चरायला जातात . ज्यामुळे त्यांचे पोट भरते आणि गोवर्धन पर्वतावर लागलेल्या झाडांमुळेच पाऊस पडतो.
मग काय भगवान श्री कृष्णाची ही गोष्ट ऐकून सर्व लोकांनी गोवर्धन पर्वताची पूजा सुरु केली. याला पाहून भगवान इंद्र खूप क्रोधीत झाले आणि त्यांनी या गोष्टीचा बदला घेण्यासाठी गोकुळात मुसळधार पाऊस सुरु केला. पाऊस इतका अधिक होता की, गोकुळातील प्रत्येक जीव आणि जंतू घाबरून गेला. भगवान कृष्णाने गोकुळवासिंना आणि त्यांच्या पशु पक्षांना मुसळधार पावसाच्या प्रकोपासून वाचवण्यासाठी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलले . आणि सर्व गावकऱ्यांना पर्वताखाली जाण्यास सांगितले.
हे पाहून इंद्राला राग आला आणि त्यांनी पाऊस अजून जास्त केला. हा पाऊस सात दिवसांपर्यंत चालू राहिला परंतु, यामध्ये कोणत्याही गोकुळवासीला नुकसान झाले नाही. तेव्हा भगवान इंद्राला समजले की, त्यांचा मुकाबला करणारा बालक कुणी साधारण व्यक्ती ही कुणी नाही तर, तर भगवान श्रीकृष्ण आहे . तेव्हा त्यांनी त्यांच्या कडून क्षमा याचना केली . या घटनेनंतर गोवर्धन पर्वताच्या पूजेची परंपरा सुरु झाली.
गोवर्धन पर्वत उत्तर प्रदेशाच्या मथुरा जिल्ह्यात आहे. गोवर्धन पूजेच्या दिवशी येथे जगातील लाखो श्रद्धालु येतात आणि गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात. गोवर्धन पूजेच्या दिवशी गोवर्धन परिक्रमेचे विशेष महत्व सांगितले जाते.
Post a Comment Blogger Facebook