नवरात्रीत ९ दिवस देवीला दाखवले जाणारे ९ नैवेद्य, नवरंग आणि माळा (2022)



 नवरात्रीमध्ये नऊ दिवस उपवास केले जातात. प्रत्येक भक्तांना या नऊ दिवसात देवीला काय नैवेद्य दाखवाव, जेणेकरून देवी आपल्यावर प्रसन्न होईल. असे वाटत असते. दरम्यान या दिवसात देवीला नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणताही उपवास पूर्ण होत नाही असे मानले जाते. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. त्यामुळे नवरात्रीमध्ये देवीला नऊ दिवस दाखवले जाणार नऊ नैवेद्य पाहणार आहोत आणि इतर ही माहिती पाहणार आहोत.


(१) सोमवार २६/९/२०२२

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीचे प्रथम रुप माता शैलपुत्रीचे पुजन केले जाते. 

🔸रंग:- पांढरा.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला गायीचे शुद्ध साजूक तुप अर्पण केले जाते.

🔸माळ:- शेवंती आणि सोनचाफ्यासारख्या फुलांची माळ.


(२) मंगळवार २७/९/२०२२

नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पुजा केली जाते. 

🔸रंग:- लाल.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो.

🔸माळ:- अनंत, मोगरा, चमेली, तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ. 


(३) बुधवार २८/९/२०२२

नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पुजा केली जाते. 

🔸रंग:- निळा.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला दुध किंवा दुधापासून तयार केलेले पदार्थ किव्वा खीर नैवेद्य म्हणून दाखवला जातो.

🔸माळ:- निळी फुलं, गोकर्णीच्या किव्वा कृष्णकमळ फुलांची माळ.


(४) गुरुवार २९/९/२०२२

चौथ्या दिवशी माता कुष्माण्डाची पुजा केली जाते. 

🔸रंग:- पिवळा.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला मालपोह्याचा किव्वा गोड भजी (गुलगुले) यांचा नैवेद्य दाखवला जातो.

🔸माळ:- केशरी(भगवी फुले)- अबोली, तेरडा, अशोक किव्वा तिळाची फुले.


(५) शुक्रवार ३०/९/२०२२

नवरात्रीच्या पाचव्या दिवशी माता स्कंदमातेची पुजाअर्चा केली जाते. 

🔸रंग:- हिरवा

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला केळीचा नैवेद्य दाखवला जातो. 

🔸माळ:- बेल किव्वा कुंकवाची माळ.


(६) शनिवार १/१०/२०२२

नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवीच्या सहाव्या रुपाची म्हणजे कात्यायनी मातेची पुजा केली जाते. 

🔸रंग:- राखाडी.

🔸नैवेद्य:- देवीला मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. 

🔸माळ:- कर्दळीच्या फुलांची माळ.


(७) रविवार २/२०/२०२२

सप्तमी दिवशी माता कालरात्रीची पुजा केली जाते. 

🔸रंग:- केशरी.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला गुळाचा नैवेद्य दाखवतात.

🔸माळ:- झेंडू किव्वा नारंगीच्या फुलांची माळ.


(८) सोमवार ३/१०/२०२२

अष्टमी दिवशी देवीच्या महागौरी रुपाची पुजा केली जाते. 

🔸रंग:- मोरपंखी.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला नारळाचा नैवेद्य दाखवला जातो.

🔸माळ:- तांबडी, जास्वंद, कण्हेर किव्वा गुलाबांच्या फुलांची माळ.


(९) मंगळवार ४/१०/२०२२

नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे नवमीला देवीच्या सिद्धिदात्रीची पुजा केली जाते. 

🔸रंग:- गुलाबी.

🔸नैवेद्य:- यादिवशी देवीला तिळाचा नैवेद्य दाखवावा.

🔸माळ:- कुकुमार्चन.

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top