प्रिय मित्रानो

आपणास कळवण्यात आनंद होत आहे कि, दरवर्षी प्रमाणे, यंदा २६ जानेवारी २०१६
रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे
डोंबिवली येथील ओम साई वृद्धाश्रम या ठिकाणी भेट देऊन तेथील वृद्ध
व्यक्तीना आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे.


आश्रमातील वृद्ध लोकांचे एकटेपण दूर करणे, त्यांना आवश्यक आधार देणे,
येणार्‍या काळात उभ्या ठाकणार्‍या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना
समर्थ करणे ह्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे.. म्हणून आम्ही एक
छोटस पाउल उचललेल आहे ..त्याला तुम्हा सर्वांचा योग्य प्रतिसाद लाभेल अशी
आम्ही आशा करतो !!

मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे, त्यामधील जेवढा वाटा आपण उचलू शकता तितका
मोलाचा ठरेल

१. तांदूळ - २५ किलो
२. तुरडाळ - १५ किलो
३. मुग दाल - १० किलो
४. गहू - ३० किलो
५. साखर - १५ किलो
६.  चहा पावडर - २ किलो
७. सनफ्लावर तेल - १५ किलो
८. आंघोळीचे साबण - ५०
९. कपडे धुण्याचे साबण - ५०
१०. टूथपेस्ट - ५०
११. वाशिंग पावडर - ५ किलो
१२. रवा - १५ किलो
१३. पोहे - १५ किलो
१४. शेंगदाणे - २ किलो
१५. फ़िनाइल - ५ लिटर
१६. ब्लेन्केट - १९
१७. टोवेल्स आणि रुमाल - १९
१८. फळे - ५०


सभासदांना मदत करावयाची असल्यास २२ जानेवारीच्या आधी खालील क्रमांकावर
संपर्क साधावा.

संपर्क:
सचिन हळदणकर : ( Central Line - 9869257808 )
संजय नायकवाडी : ( Central Line - 9819004049 )
देवेन सकपाळ : ( Western Line - 9022260765 / 9619686061 )
रोहित वेलवंडे : ( Central Line - 9594441099)
धनाजी सुतार : ( Harbor Line - 9930092307 )
अरविंद गणवे ( Harbor Line -  9870595459 )

आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.

नोंद : जे सभासद वृद्धाश्रमाला भेट देण्यास उत्सुक आहेत त्यांनी
9869257808 या नंबर वर संपर्क साधावा. ट्रेनचे वेळापत्रक नंतर देण्यात
येईल , ज्यांना शक्य आहे त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान करावी.

आभार
टिम मन माझे

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top