तू जवळ नसतोस तेव्हा काय करू काही सुचत नाही
कारण
ह्या मनात भरपूर काही असतं
पण ते ओळखणारं कुणीही नसतं ....
ह्या डोळ्यांना खूप काही बोलायचं असतं
पण ते वाचणार कुणीही नसतं ...
ह्या ओठांना खुलून हसायचं असतं
पण त्यांना हसवणार कुणीही नसतं....
ह्या नाकाने फुलांचा सुगंध घ्यायचा आसतो
पण ती देणारं कुणीही नसत ...
ह्या कानांना खूप काही ऐकायचा असतं
पण ऐकवणार कुणीही नसत....
ह्या हातांना कुणालातरी कुरवाळायच असतं
पण जवळ कुणीही नसत....
ह्या पायांना कुणाच्यातरी सोबतीने चालायचं असतं
पण चालायला कुणीही नसतं ....
तू सोबत नसताना हे सगळा असं असतं
म्हणून म्हणते कि मला सोडून कुठेही जायचं नसत...

कवियेत्री : तेजश्री सावकारे

Post a Comment Blogger

 
Top