प्रिय मित्रानो
आतापर्यंत मन माझे तर्फे ज्या ज्या मदत योजना राबवण्यात आल्या, तुम्ही सर्वांनी त्या उपक्रमासाठी भरभरून सहकार्य केले त्याबद्दल आम्ही तुम्हा सर्वांचे शतशः ऋणी आहोत.
यंदा प्रजासत्ताकदिनानिमित्त आम्ही पुन्हा एकदा मुक्ता प्रकल्प बालिका भवन, टिटवाळा येथील मुलींसाठी मदत योजना हाती घ्यायचे ठरवले आहे. या ठिकाणी भेट देऊन तेथील लहान मुलीना 'मन माझे' आणि 'हेल्पिंग हैन्ड' तर्फे आम्ही अन्न पुरवठा, देणगी आणि भेटवस्तू द्यायचे ठरविले आहे. आपण दिनांक २६ जानेवारी २०१५ रोजी या आश्रमास भेट देऊन त्या सर्वांना भेटवस्तू देणार आहोत.
अंदाजे ४५ मुली आणि १० स्वयंसेविका या आश्रमामध्ये आहेत आणि या उपक्रमासाठी लागणारी मदतीची यादी पुढील प्रमाणे आहे :
१. मुलांसाठी नेहमी लागणारा सुका नाश्ता - राजगिर्याचे लाडू ( २५०) ,
फरसाण ( ५ - १० किलो ), बिस्किटे ( २५० पुडे )
२. १०० - २०० फळे
३. ४५ चित्रकला वही
४. ४५ आलेख वही
५. ४५ स्केच पेन्स
६. ४५ पेन पेन्सिल रबर गिरमिट
७. ६० साबण
८. ६० तेल बॉटल्स
९. ६० टूथपेस्ट
१०. ६० टूथब्रश
११. १००-२०० छोटी चोक्लेट्स
१२. ६० मोठी चोक्लेट्स
१३. व्हाईट बोर्ड 3 ft. x 4 ft. ( फळा )
१४. जुनी खेळणी चांगल्या स्थितीमधली
१५. जुनी गोष्टीची पुस्तके
तरी आम्ही सर्वांना नम्र विनंती करत आहोत कि, या उपक्रमासाठी
ज्या सभासदांना आणि हितचिंतकांना देणगीद्वारे सढळ हस्ते मदत करावयाची
आहे आणि ज्यांना सामील व्हायचं आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधावा ( प्रवास
खर्च, नाश्ता जेवण ई. स्वखर्च असेल याची नोंद घ्यावी ) :
संपर्क:
सचिन हळदणकर : (Central Line - 9869257808)
देवेन सकपाळ : (Western Line - 9022260765)
धनाजी सुतार : (Harbor Line - 9930092307)
अरविंद गणवे ( Harbor Line - 9870595459 )
संजय नायकवाडी (Central Line - 9819004049)
नोंद : ट्रेनचे वेळापत्रक नंतर देण्यात येईल , ज्यांना शक्य आहे त्यांनी
शुभ्र,भगवी किंवा हिरवी वस्त्रे तिरंग्याच्या सन्मानार्थ परिधान करावी.
आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत.
आभार
टिम मन माझे...
Its nice step u taking about charaty good i m proud of u and your all group Members.!
ReplyDeletekeep it on.!