सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
।। ओम द्रां दत्त्तात्रेयाय नमः ।।
।। ओम द्रां दत्त्तात्रेयाय नमः ।।
आजच्या ह्या मंगलदिनी सर्व दत्तभक्तांच्या मनातील सर्व ईच्छित मनोकामना श्री दत्तमहाराज पूर्ण करोत, हिच दत्तचरणी प्रार्थना...
दत्त म्हणजे साकार होणे, प्रगट होणे, अवतिर्ण होणे.
परमेश्वर आपल्या शरिराच्या रुपाने साकार झाला. शरीर रुपाने आपण दिसतो पण मन व ईश्वर रुपाने आपण गुप्त आहोत. याचेच प्रतिक म्हणजे दत्त.
तीन शिरे :- शरीर + मन + चैतन्य (परमेश्वर).
मनाचे दोन हात - बहिर्मन व अंतर्मन
चैतन्याचे दोन हात - जाणिव व नेणीव.
गाय म्हणजे अधिष्ठान असणारी चैतन्य शक्ती.
श्वान म्हणजे श्वास की ज्यामुळे जीवन आहे.
हातात त्रिशूळ म्हणजे हाताने काम, मुखाने नाम व अंतकरणात राम अशी जगण्याची जीवन शैली.
काखेत झोळी म्हणजे सतत इतरांकडून ज्ञान मिळवत रहा.
किंबहुना आपण (दत्त) जन्माला येतो तो ज्ञान मिळविण्यासाठी.
जो ज्ञान देतो तो गुरु आणि देतो तो देव.
सदगुरुने दिलेल्या ज्ञानाने आपणच दत्त म्हणजे देव होणे म्हणजेच गुरुदेव दत्त.
म्हणून ख-या अर्थाने असा दत्त आपल्या ठिकाणी जन्माला येणं म्हणजेच दत्तजयंती.
अशा दत्तजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा...
॥ श्री गुरूदेव दत्त ॥
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा