चातकासारखी वाट पाहतेय मी
धुंद पावसाल्साळयासारखा एकदाच ये तू .
प्रेमाची धुंदी हवीय सारी,
तो कैफ जुना पुन्हा एकदा चढवायला ये तू
सात जन्मच प्रेम माझ हक्काच,
या एकाच जन्मात भरभरून द्यायला ये तू.
प्राजक्त फुललाय फांदीवर ह्या
सुगंधाच दान पदरात त्याच्या टाकायला ये तू .
बाग हि बह्र्लीय अशी थंडीतही
दाणा हिच्या कणसाचा घ्यायला ये तू .
सुगंधाच काय घेऊन बसलास?
बहर सारा तुझाच आहे,तो लुटायला ये तू
दोघांचा आहे प्रवास सगळा
पावल माझ्या पावलांशी जुळवायला ये तू .
माझा शब्दन शब्द तुझाच आहे,
कविता आहे तुझ्याचसाठी,हि वाचायला ये तू .


कवयित्री : प्रतीक्षा गायकर ,बदलापूर

Post a Comment Blogger

 
Top