तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी नाही कळले कधी
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो मी तुला तू मला ,
नाही कळले कधी धुंध हुरहूर ही ,
श्वास गंधाळला ओळखू लागलो तू मला मी तुला ,
नाही कळले कधी
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो

तू कळी कोवळी साजरी गोजरी ,
चिंब ओल्या सारी घेत अंगावरी
स्वप्न भासे खरे ,स्पर्श होता खुळा
ओळखू लागलो तू मला मी तुला
धुंध हुरहूर ही ,श्वास गंधाळला
ओळखू लागलो मी तुला तू मला ,
नाही कळले कधी
शब्द झाले मुके बोलती पैंजणे
उतरले गाली या सोवळे चांदणे
पाहतानाही तुला चंद्र ही लाजला
ओळखू लागलो तू मला मी तुला
नाही कळले कधी जीव वेडावला
ओळखू लागलो मी तुला तू मला
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
तू मला , मी तुला गुणगुणू लागलो
पांघरु लागलो सावरू लागलो
नाही कळले कधी
नाही कळले कधी !!

Post a Comment Blogger

 
Top