ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा

कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना

आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना

सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया

माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या

रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे

वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे

डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे

सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला


चित्रपट - प्रेमाची गोष्ट
दिग्दर्शक - सतीश राजवाडे
कलाकार - अतुल कुलकर्णी, सागरिका घाटगे, सुलेखा तळवलकर, मीरा वेलणकर, सतीश राजवाडे, रोहिणी हट्टंगडी, अजय पुरकर
संगीतकार - अविनाश - विश्वजित
गीतकार - अश्विनी शेंडे
वर्ष - २०१२


आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top