सगळ्यांपेक्षा वेगळी तु नक्किच आहेस. .
पाण्याहुनी खळखळूण तुझं हसण आहे..
फुलापेक्षाही नाजुक तुझं बोलणं
स्वप्नापेक्षा सुदंर तुझं दिसणं
त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे.......
काचेहुन ही निर्मळ तुझ मन
बाणां पेक्षा ही धारदार तुझे नयन
मधा पेक्षा ही मधाळ तुझी वाणी
त्यापेक्षाही सुदंर तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे.......
सांज वेळची लाली तुझ्या गाली उतरली
गुलाबांनी ओठावरची गुलाबी चोरली
तुझ्या रुसण्या मध्ये सुद्धा एक अदा आहे
ह्याच सर्व गोष्ठीवर मी फिदा आहे..
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुदंर .......... तु नक्किच आहेस....
पण............. त्यापेक्षाही सुदंर
तुझं माझ्या आयुष्यात असणं आहे.......
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
Post a Comment Blogger Facebook