पिकनिक साठी आपण
सर्वच आतुर आहात, हे आम्हालाही माहिती आहे. तर तयार व्हा हिरव्यागार
निसर्गाच्या कुशीत फिरायला आणि पावसाळी पाण्यात चिंब भिजायला ...कारण आपली
पिकनिक १२ ऑगस्ट,२०१२ रोजी कर्जत येथील कोंडाणा लेणी आणि वॉटरफॉल येथे
नेण्याचे योजिले आहे.
तरी ज्या सभासदांना पिकनिकला यायचं असेल त्यांच्यासाठी काही सूचना:- १) पिकनिकचे शुल्क :- रु. ३५० फक्त. ( Non - Refundable) ( प्रवास खर्च + सकाळचा चहा, नाश्ता, आणि दुपारचे जेवण आणि संध्याकाळी चहा समाविष्ट ) २) येताना स्वतःसोबत एक जोडी (extra) कपडे आणावेत. 3) कोणत्याही मौल्यवान वस्तू (चैन, अंगठी वगैरे...) स्वतःसोबत बाळगू नयेत.
४) १२ ऑगस्ट,२०१२ रोजी सकाळी दादर स्टेशन वरून ट्रेन आहे. तरी आपण
सर्वाना, ६.३० पर्यंत दादर स्टेशन (पश्चिम) बाहेरील सुविधा सारी सेंटर
बाहेर भेटायचे आहे. जे सभासद बाकीच्या ठिकाणी भेटणार आहेत त्यांनी तसे
कळवावे. सर्वांनी कृपया वेळेवर यावे कारण ट्रेन चुकली तर पुढील ट्रेन लवकर
नाही. ५) कर्जत बाहेरून किंवा पुण्यावरून जे सभासद येण्यास इच्छुक आहेत
त्यांनी कर्जत मार्गे यावे आणि कर्जत स्टेशन वर ८.४५ वाजता भेटावे. (
त्यांच्यासाठी शुल्क ३०० रु. राहील ) ६) धुम्रपान आणि मद्यपानास परवानगी नाही.
०५ ऑगस्ट ला आपण सारे नारळीबाग, शिवाजी पार्क दादर येथे मैत्री दिन अर्थात
फ्रेन्डशिप डे साठी संध्याकाळी ४ वाजता भेटणारच आहोत तर इच्छुक सभासद
तेव्हा पिकनिकचे शुल्क देवू शकतात . पिकनिकचे शुल्क पुढील सभासदांकडे जमा
करू शकता , शुल्क जमा करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट आहे याची नोंद
घ्यावी.
संपर्क : सचिन हळदणकर : ९८६९२५७८०८ ( Central Line - 9869257808 ) देवेन सकपाळ : ९०२२२६०७६५ / ९६१९६८६०६१ ( Western Line - 9022260765 / 9619686061 ) धनाजी सुतार : ९९३००९२३०७ ( Harbor Line - 9930092307 ) रोहित वेलवंडे : ९८७०५८५८३१ ( Central Line - 9870585831)
Post a Comment Blogger Facebook