प्रिय मित्रानो,

              दिनांक ३० ऑक्टोबर २०११ रोजी ठरल्याप्रमाणे मन माझे ग्रुप मीटिंग आणि दिवाळी स्नेह भेट झाली .सायन स्टेशन ला धनाजीने आणलेल्या चोकलेटसचा आस्वाद घेतला आणि मग सायन किल्याकडे रवाना झालो ...सायन किल्यावर फोटो सेशन आणि गप्पा एन्जोय केल्या ..काही नव्या सभासदांची आम्हाला भेट घडली. मीटिंगचा महत्वाचा विषय म्हणजे मन माझे तर्फे टिटवाला येथील अनाथाश्रामामध्ये मदत करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याला प्रतिसाद म्हणून काही सभासदांकडून देणग्या प्राप्त झाल्या..त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार !!
 खूप धम्माल मस्ती करत रुशालीच्या घरी फराळ केला.. रुशालीला दिवाळी आमंत्रण आणि फराळासाठी धन्यवाद !!
 जे नाही आले त्यांना मिस केले ..त्यांची कमतरता जाणवली.

टीम मन माझे तर्फे आलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.. असच मन माझे वर सदैव प्रेम राहूद्या !!




 


 


--
आभार
टिम मन माझे.....

Post a Comment Blogger

 
Top