मन माझे संस्थेतर्फे आम्ही १५ ऑगस्ट २०११ रोजी पनवेल तळोजा येथील परमशांतीधाम वृधाश्रमासाठी काही मदत योजना आखली आणि तिथे जायचा योग आला ..आणि एक हृदयस्पर्शी अनुभव अनुभवायला मिळाला तोच थोडक्यात सर्वांसोबत मांडत आहे ..
अंदाजे सकाळी १० च्या सुमारास परमशांतीधाम आश्रमात आम्ही प्रवेश केला
आणि एक आजोबा जाड भिंगाचा चष्मा , अंगावर करड्या रंगाच हाल्फ शर्ट घालून उभे होते आणि जिज्ञासेने पाहत होते कि आम्ही कुठून आलो आहोत ...
बाहेर आमच्या गाडी वरील नाव वाचून गाडी कडे बोट करून तेच बोट ... आमच्याकडे फिरवत त्यांच्या थरथरनार्या आवाजात "मंन माझे आणि काही शब्द पुटपुटले, आणि मि म्हटलं.. "हो आमचा मंन माझे ग्रुप आहे ..तिथून आलो आहोत सर्व !!" :) त्यांच्याशी दोन शब्द बोललो ..त्याचं नाव जोशी होत !!
तिथे रोज सत्संग १२ च्या आसपास सुरु होत असल्यामुळे आमच्याकडे फक्त दोन तास होते ज्यामध्ये आम्हाला त्यांना आणलेली भेटवस्तू द्यायची होती ..अंदाजे ७५ वयोवृद्ध त्या आश्रमात होते ..२ मजली इमारतीत वेगवेगळ्या खोलींमध्ये ४ ते ६ असे वयोवृद्ध एकत्रपणे राहतात ..
आणि मग आम्ही एक एक आजोबा आजीना भेटावयास सुरवात केली ..
पहिल्यांदाच मि ज्या आजोबाना भेटलो त्यांच्या ओठांवर सुरेख स्वागतार्ह्य हास्य होते आम्ही त्यांची विचारपूस केली ..अगदी उत्कृष्ट इंग्लिश भाषेत ते आमच्याशी बोलत होते ..
.
पुढे एक आजोबा ज्याना भेटताच त्यांच्या डोळ्यात अश्रू भरून आले ...
हिंदीत म्हणाले .." तुम सब लोगो ने हमारे लिये वक़्त निकाला और मिलने को आये .. .हमे बहोत अच्छा लगा ..दिल खुश हो गया..भगवान आप सबका भला करे " ..असे म्हणत त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले ..त्यांच रडू सावरता सावरता माझे डोळे पण पाणावयाला सुरु झाले ...त्यांच्या अश्रुनी डबडबलेल्या डोळ्यांमध्ये खूप प्रेम दिसत होत आमच्यासाठी ....
नंतर एका आजोबांची तब्येतीची विचारपूस केली ....
त्यांच्या मुखातून उत्साहाने शब्द निघाले ..अरे आजारपण तर येत जातच असत ..लाईफ मध्ये चेंज असायलाच हवा ..एक रुटीन लाईफ असं हे कटाळवाणे असत ..सो चेंज इस मस्ट इन लाईफ ..:) त्यांचे स्मितहास्य नजरेत टिपत आम्ही पुढच्या खोलीत गेलो
त्या खोलीत एक अपंग वृद्ध बिछान्यावर झोपून होते ..दोन्ही हात छातीशी खिळलेले , बोलायला जमत न्हवत ..ना हि उठायला जमत होत ...पण आम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता ..आम्ही त्यांची विचारपूस करत होतो तेव्हा तेथील काम करणारा मुलगा आम्हाला ते काय बोलत आहेत ते समजावून सांगत होता ..त्यांनी इशार्यानी सांगितलं कि ते गुजराती आहेत ..मग मित्राने गुजराती भाषेत काही शब्द बोलताच त्याच्या चेहरा आनंदी झाला ..
आमच्याकडील तिरंगी झेंडा त्यांना हवा अशी इच्छा केली आणि तो लावताना फोटो काढावा अशी इशार्याने विनंती केली ..काढलेला फोटो पाहून पुन्हा त्यांचा चेहरा आनंदाने फुलला ..त्यांनी त्याचं नाव सांगण्याचा प्रयत्न केला ..किशोरकुमार ठक्कर आणि फोटो पाठवण्याची विनंती केली ..शरीराने अपंग असूनही मनाने अगदी एका तरुण मुलाप्रमाणेच वागत होते हे पाहून खूप आनद झाला ..
पुढे एक आजोबा ..नाव रघुनाथ शेळके ......"इंग्लिश येत तर ति व्यवहारात वापरा , जग खूप पुढारलेल आहे" असे आम्हास उत्स्फुरतेने म्हणाले ...आंबेडकरांचे भक्त असे ते आजोबा शेरो शायरी खूप छान करतात असे कळल ..मित्रा कडे त्यांच्या काही कविता आहेत त्या मि आपणास सादर करतों
किसीकी याद मेरे आस पास रहती है
बहुत दिनोंसे तबियत उदास रहती है
बिछड गये मगर दिल मानता नही
क्यों उसे मिलने की आस रहती है
मौत सबकी मंजिल है
जिंदगी एक सफर है
मत तोडना किसीका दिल
हर दिल खुदाका घर है
आशिक कभी मरते नहीं
जिंदा दफनाए जातें है
जब भी कबर खोल के देखो
ईंतजार मे पाए जाते है
किसीको अपना बनानेसे क्या फायदा
अब किसीका किसीको भरोसा नही
मेरे पहलु उठकर चले भी गए
वादा-ए-वापसी का भरोसा नही
देखो टकरा रही है नजरॊसे नजर
वो न आए न आयी खुशियोंकी घडी
जानेवाली खुषी तो चली भी गई
आनेवाली खुषी का भरोसा नही
फैसला साथ रहनेंका करलो अभी
आजका काम कलपर ना डालॊ कभी
जिंदगी कल रहे ना रहे क्या खबर
जानेमन जिंदगीका कुछभी भरोसा नही
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?
हा कलीयुगाचा फेरा
कसा वाहे उलटा वारा
ना सत्याला थारा देवा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?
सांगे कोणी भोळ्या जनतेला मी देशभक्त मोठा
मारुनी थापा सा-या कमवी सा-या नोटा
नसे देशभक्ती त्यांची होई बोजवारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?
ठाई ठाई अन्याय अत्याचारा तो उत येई सारा
पाहुनी कोणी दुबळ्या अबलेवर करती बलात्कार न्यारा
मग सांग देवा तुच आता देईल कोण निवारा??
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?
सत्य अहिंसेचे सारे गोडवेच गाती
पण वरकरणी पाहूनी फुक न्याय करती
पुसे शेळके दादा कुठवर चालेल हा नंगानाच सारा
असा कसा दरबारी न्याय तुझा न्यारा?
पुढील खोलीत एका आजोबांशी संवाद साधला ..
गावापासून सर्व विचारपूस केली माझी ..आणि एक फोन करू का ? अशी विनंती केली ..मि त्यांनी सांगितलेला नंबर लावून दिला ..आपल्या नातेवाईकांशी त्यांनी थोड्या गप्पा मारल्या, विचारपूस केली त्यांची ..त्यांचे नातेवाईक मला विनंती करून म्हणाले कि त्यांच्याकडे मोबाईल दिला आहे पण त्याना चार्ज कसा करायचा , चालू कसा करायचा माहित नाही ..प्लीस सांगाल का ?..
मि सोप्याभाषेत सांगण्याचा पर्यंत केला ...पण त्यांच्यासाठी हे तंत्र समजण अवघडच असावे ..
पुढच्या खोलीमध्ये गेलो ..एक वृद्ध आजी बेडवर पडून होत्या ....
नुकतेच काही महिने त्यांची तब्येत ढासळलेली होती अस त्यांच्या बोलण्यातून समजल ...सुरवातीला शांत चेहरा वाटल्यामुळे ..कदाचित त्या काही जास्त बोलणार नाहीत अस वाटत होत ..पण मि थांबलो आणि विचारपूस केली आणि त्यांनी बोलायला सुरवात केली ..
आर यु मराठी ? अस विचारून त्याना आम्ही हो म्हटल्यावर मराठीत संवाद सुरु केलां ..त्यांनी इतक्या वर्षात कधी औषध घेतलीच नाहीत असे म्हणाल्या ..त्यांची एक मैत्रीण येते आणि ते रेकी ट्रीटमेंट करतात ..वय वाढल्यामुळे फरक लवकर नाही पडत रेकीचा पण त्यांची तब्येत सुधारत आहे याची त्याना जाणीव होती ..आध्यात्मिक विषयावर बोलण्यास त्यांनी सुरवात केली आणि सप्त शरीराबद्दल थोडीफार माहिती दिली कि मानवाच्या सप्त शरीरामधील वरच्या पातळीवरील ३ सुश्म शरीरांना जर इजा पोहोचली तर इतर शरीराला व्याधी होतात ...इत्यादी थोडफार आध्यात्निक ज्ञान आम्हाला सांगितलं याचबरोबर तुमच्या ज्या स्किल्स आहेत त्या तुम्ही वापरून स्वताचा विकास करावा असा मोलाचा सल्ला पण दिला ...
त्यानंतर एका काकुना आम्ही भेटलो ..
मि गेलो तेव्हा त्या इतर सभासदांशी बोलत आणि रडत होत्या ..त्यांची कहाणी ऐकून खूप वाईट वाटलं ..मुलगी झाली म्हणून नवर्याने घरा बाहेर काढलं आणि त्याच मुलीला सांभाळून त्यांनी मोठ केल लग्न लावलं ..घर मुलीच्या आणि जावयाच्या नांवावर केल आणि शेवटी त्यांनाच घराबाहेर पडाव लागल ..एका मातेच हृदय ओक्षाबोक्षी रडत होत ..मला म्हटलं किती सांगेन तुला माझ दुखः खूप आहे सांगण्यासारख ..माझे डोळे सुद्धा भरून आले .आणि त्याचं जगन पाहून हेच शब्द आठवले ...
कुणीच कोणाचा नसतो साथी
देहाची अंती होते माती
आपणच आपल्या जीवनाचे सोबती
हवीत कशाला हि खोटी नाती .
.....थोडावेळ तिथेच राहिलो काकुंच्या डोळ्यातील अश्रू कमी होई पर्यंत .......
बाहेर आलो तर काही आजोबा आमच्या ग्रुप बरोबर गप्पा मारत होते ..
मस्करी थट्टा विनोद सुरु होते ...आम्ही रिक्वेस्ट केल्यावर एका आजोबांनी " पावलीला बोंबील बारा ..." .तसेच "धनगर राजा वसाड गावाचा......" हि सुंदर गाणी बोलून दाखवली ,.. तेवढ्यात ते दुसरे आजोबा ज्यांनी फोन लावायला विनंती केलेली ते आले ..
आणि आजारी असल्यामुळे खुर्ची वर बसून आम्हाला काही गाणी ऐकवली ..वयाच्या मानाने त्याचा आवाज आजही एका तरुणाप्रमाणे होता आणि खूप सुंदर अशा आवाजात त्यांनी गाणी ऐकवली .." शाम ढले..खिडकी तले तुम सिटी बजाना छोड दो........." , " ए मेरे दिल काही ..और चल, गम के गम कि दुनिया से दिल भर गया.........." तसेच " मेरा दिल ये पुकारे आजा ...मेरे गम के सहारे आजा...भीगा भीगा ये समा.... " इत्यादी जुनी सुंदर गाणी बोलून दाखवली, त्यांच्या गाण्यात आणखी एक खासियत होती कि ते शब्दांमार्फत मुझिक सुद्धा देत होते ! तब्येतीच्या तक्रारी मुळे जास्त वेळ बसू शकत न्हवते म्हणून आम्हाला विनंती करून एक गाण मधेच थांबवाव लागल त्यांना ...
नंतर सत्संग सुरु झाला आणि तासभराने भोजनाची वेळ झाली ....." ओम चैतन्य गगनगिरीनाथाय नमः " हा मंत्र जप भोजनापूर्वी सर्व जण करत होते आणि सर्वांनी जेवण ताटात वाढून घेतल्यावरच एकत्र सर्वांनी भोजन सुरु केल ,
आम्ही त्यांना भोजन वाढून आनद आणि थोडफार पुण्य मिळवलं तसेच तेथील काकुंच्या विनंती म्हणून स्वामींचा प्रसाद म्हणून थोडस अन्न ग्रहण केल ..!
काही आजोबा आजी हे ठाण्याला एका कार्यक्रमाला गेलेले त्यातील एका आजोबाना आम्ही जाता जाता भेटलो ..प्रसन्न व्यक्तिमत्व , चेहऱ्यावर तेज ,,त्यांचे बोल ऐकून सर्व जण भारावून गेले होते ..
आमचे आभार मानून ते म्हणाले कि मानवसेवा सध्या दुर्मिळ होत चालली आहे ..जग आता अस आहे तर उद्या यापेक्षा बिकट परिस्थिती येवू शकते म्हणून उद्या कुठे वृद्धाश्रम असू नये अशीच आशा त्यांनी व्यक्त केली ..सर्वजन आपल्या संसारामध्ये सुखी असावेत आणि कोणाला वृद्धाश्रम मध्ये जाणे लागू नये अशीच प्रार्थना त्यांच्या शब्दातून दिसत होती ..
सर्वांशी भेटून मनाला एक आत्मिक समाधान लाभल ..सर्वाना जो वेळ दिला तो खूपच कमी होता अस भासल ..प्रत्येकाच दुख इतक मोठ आहे कि त्याना जेवढा वेळ देवू तेवढा कमी आहे ...मित्रानो आपण जी मदत केली आहे त्यापेक्षा खरी त्याना गरज आपल्या प्रेमाची आणि वेळेची आहे म्हणून मन माझे कडून पुढे सुद्धा असेच कार्य होत राहील असा आपण प्रण करू !!
धन्यवाद !!
- सचिन हळदणकर