*(टीप- प्रस्तुत कविता हि "मी सिंधुताई सपकाळ" या चित्रपटाने प्रेरित आहे ...
ज्यांनी हा चित्रपट पहिला असेल ... त्यांना नक्कीच समजेल......)


**उतरले नव्हते अजून
पाठीवरील शिक्षणाचे ओझे
लहानपणीच संसारात सांगा
मन कसे रमले हिचे ?
हसण्या - खेळण्याच्या दिवसात असे
मातृत्व हे आले
सासरी नांदताना मात्र
बालपण कधीच हरवले
सुखी संसाराचे स्वप्न पहिले
मग मेघ काळे का दाटले.. ?
तुकड्या - तुकड्याने काळीज फाटले
जेव्हा पतीनेही झिडकारले
इवलासा जीव कुशीत घेऊन
भिक मागितली घरदार असून
मरण हि येईना.. थांबे पुढ्यात येऊन
पोटच्या गोळ्याची करून हाक ऐकून
नियतेनीही बघा हिला कशी फिरवली
मातेनेही कशी दूर लोटली?
घरदार , धनी असून देखील
पोरीला या अनाथ केली ...
पोरके झालेल्या लेकरांची
आस हिला लागली
कोठे होती? कोठे गेली?
अनाथांची हि "माई" बनली ....*

आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top