उन जरा जास्त आहे...दर वर्षी वाटत
भर उन्हात पाऊस घेऊन...आभाळ मनात दाटते
तरी पावले चालत राहतात...मन चालत नाही
घामा शिवाय शरीरात...कोणीच बोलत नाही
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
तितक्यात कुठून एक ढ़ग सुर्यासमोर येतो
उन्हा मधला काही भाग पंखांखाली घेतो
वारा उनाड़ मूला सारखा सैरा वैरा पळत रहातो
पाना फूला झाडांवरती छ्परावरती चढूंन पाहतो
दूपार टळून संध्याकाळचा सुरु होतो पुन्हा खेळ
उन्हा मागुं चालत येते गार गार कातरवेळ
चक्क डोळयां समोर रुतु कूस बदलून घेतो
पावसाआधी ढ्गां मधे कुठुन गारवा येतो ...
गारवा..... ह्म्हम्म्मम ह्म्हम्म्मम
वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये............. नभात ही, चांदवा नवा नवा
गारवा......................
गवतात गाणे झूलते कधीचे....२
हिरवे किनारे हिरव्या नदीचे...२
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये......... मनात ही, ताजवा.... नवा नवा
गारवा......................
आकाश सारे माळून तारे.... २
आता रुपेरी झालेत वारे........२
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये.......... तुझा जसा, गोडवा... नवा नवा
गारवा......................
वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये............. नभात ही, चांदवा नवा नवा
गारवा......................
गीतकार :सौमित्र
गायक :मिलिंद इंगळे
संगीतकार :मिलींद इंगळे
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा