दूरवर असलेल आकाश जेव्हा ठेंगण वाटत
जमिनीवर चालताना उडतोय आपण
असा भास होतो
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
तो कुठे तरी जवळपासच असेल
या विचारांनी नजरेच भिर भिरण
आणि तो दिसताच मात्र
नजरेच आपसूकच झुकण
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
भावना मनात फुलतात
पण शब्दात सागता येत नाही
गहिवर्लेल्या शब्दाना ओठांनी वाट अड्तात
तर डोळ्यांनी बोलल्या जातात
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
सर्व त्रुतु मनाला गवसतात
त्याच येन गार हवेचा शहारा
आणि नाव घेताच मनात
विज चमकन......
तो नसताना मात्र कोरड पडन
तेव्हा समजावं कि खर प्रेम झालय.
साभार - कवियेत्री : प्रिया उमप
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा