घेलाशेठ पक्का  कंजूष माणूस. त्याची मागील तीन चार दिवसापासून  एक दाढ दुखत होती. पण पैसा खर्च होईल म्हणून तसाच त्रास सहन करत होता. शेठाणीने  डॉक्टरकडे जाण्याचा आग्रह धरला तेव्हा घरीच दाढ काढली तर चालणार नाही का? असा प्रतिप्रश्न त्याने बायकोला केला. शेवटी बायकोने बराच आरडा ओरडा केल्यानंतर घेलाशेठ एकदाचा  दंतवैद्याकडे गेला. डॉक्टर माजा   उजव्या बाजूचे  दाढ लई  दुकते, तेचा किती पैसा  घेणार? काहीतरी कमी घ्या आम्ही तुमचा फायदा करू अशी बडबड करून त्याने डॉक्टरला पटवण्याचा प्रयत्न  केला.  काही काळजी करू नका शेठजी, आरामात या खुर्चीत बसा आणि तोंडाचा आ करा व काहीही बोलू नका, मी तुमचा फायदा करून देणार आहे.

तेव्हा कुठे घेलाशेठ  खुर्चीत तोंड वासून बसला.  झालच हं म्हणत डॉक्टरांनी घेलाशेठच्या दोन दाढा उपटल्या.  डॉक्टर बाजूला झाले तसा घेलाशेठ खुर्चीतून थयथया नाचत उठला,  डॉक्टर हे काय केला तुमी  मी एक दाढ काढायला सांगितला ने तुमी तर माझा  दोन दाढा उपटले की.  दोन दाढेचे पैसे द्यावे लागणार  ह्या  कल्पनेने अस्वस्थ झालेला घेलाशेठ ठणाणा बोंबलत सुटला. 
डॉक्टर हसत म्हणाले काही काळजी करू नका घेलाशेठ, मी तुम्हाला आश्वासन दिल्याप्रमाणे तुमचा फायदा केला आहे. तुम्ही फक्त एकाच दाढेचे पैसे द्या. कारण सध्या आमचेकडे एकावर एका फ्री ची स्कीम सुरु आहे! :) :) :) :) 




टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top