रस्त्यावर पडलं कुणी चुकून तर अजुनही लोक उचलायला धावतात,
आणि आपली कितीही सुंदर असली तरी आम्हाला साध्याच पोरी भावतात ॥

मर्दानी शस्त्र आणि मर्दानी खेळ घराघरात जपले जातात,
अरे चौकातुन तर सोडाच पण महापालिकेतही त्याची प्रात्यक्षिके होतात ॥

'हाइड-आउट' कितीही स्वस्त झालं तरी 'टपरी'वर च गर्दी असेल,
आणि मिसळच्या रश्श्यावरती पिळदार मिशी तुटून पडेल ॥

'यु एस' मधे असलो तरी 'गोदा-काठ'ची च आठवण असेल,
'रॅप' कितीही ऐकले तरी 'लावणी' ऐकुनच मान डुलेल ॥

'केक- पेस्ट्रीज'कितीही खा, त्याला इथल्या द्राक्षांची चव नाही,
आणि 'आडिडास' च्या शूजला इथल्या 'पायताणाची' सर नाही ॥

अरे कितीही मोठे झालो तरी तोंडात झणझणीत शिवी असेल,
आणि फाडफाड इंग्रजी बोललो तरी रांगडी मराठी च हवी असेल ॥

'क्रिकेट- फुटबोल' काहीही येवो 'कबड्डी' चा मान त्याला नाही,
आणि इंग्लंडच्या लंडनलाही 'नाशिक'ची शान नाही ....

!!! " मी अस्सल नाशिककर " !!

 आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top