वरुन हसण सर्वांनाच दिसते..
किती हसते अस बोलतात सगळे..
हसण माझ कोणाला नको असते..
पण काय करू? त्यामुळेच मी जगत असते..
मनातल पाणी वाहत नसते..
पातळी मात्र वाढतच असते..
सांगाव कोणाला कुठे थांबावस वाटते..
पण काय करू? विश्रांती घेण्यास जगच नसते..
कोणाला ते कधी दिसत नसते..
देवाला ते भासत नसते..
रांगेत माझी पण एक प्रार्थना असते..
पण काय करू? देवा जवळ भरपूर काम असते...
साभार - कवीयेत्री - रूचि
साभार - कवीयेत्री - रूचि
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा