कान्हा नेहमी बासरी वाजविती..
पैजन माझे छम छम  करती..

पहाटेचा सुर्य रस्ता दाखवी..
जा राधे अस हळूच सांगती

घागर घेऊन नदी काठी मी..
गोपाळ मज येऊन छेडती..

हळूच नदीचे पाणी उडवत..
मजला तो प्रेमानि  भिजवती

बघेल कोणी, सांगून त्याला..
मी हळूच जाण्यास निघति..

बासुरी वाजावून  मला अडवती..
राधा ही फक्त हरी ची सांगती

साभार - कवीयेत्री - रूचि


टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top