पाऊसात  चिंब  मी  भिजले  जरी ..
हृदयात  तूच  असणार  आहे ..
मिठीत    तुझ्या  ओली  चिंब ..
वेगळीच  रात्र  हसणार  आहे ..


बरसू  दे  त्याला  आज  ..
तुलाच  मदत तो करतो आहे..
मला  भिजून  पाण्यानी ..
तुला  हाक  मारण्यास  सांगते  आहे ..


चिंब  साडीचा  पदर  माझा ..
तुझीच  वाट  पाहत  आहे ..
येऊन  घे  कवेत  मला ..
माझी  झुकलेली  नजर   तुला  बोलते  आहे ..


तो  स्पर्श  पावसाचा ..
तुझाच  आभास  भासवत  आहे ..
त्याच्यात  भिजुनी  ओलीचिंब
मी  तुझ्यातच  एकरूप  होत  आहे ..



ये  चातका  आता ...
तुझीच  वाट  पाहत  आहे ..
ओठांवरील  हा  पाऊसथेंब
तुज्यासाठीच  तरसत  आहे .


भिजले जरी पावसाने मी
अजुनी आतुनी कोरडी आहे
मिठीत येऊन तुझ्या
पूर्ण ओलिचिम्ब व्हायचे आहे

ओठांवरचा एक थेंब जरी तो
समुद्राचा होतो भास आहे
नसेल शक्य तुझ्या मिठीत
पण येण्याची तरी आस आहे


कवी -  रुची-सचिन

Post a Comment Blogger

 
Top