मी जेव्हा नापास झालो. ...
वाटल जगण्याला मी नालायक ठरलो.
तोन्ड खुपसुन उशीत ढसा ढसा रडलो,
पराभवाच्या ओझ्याने पार खचलो.
असे का झाले म्हणुन
स्वतःवरच चीडलो,
कुवतच नाही मझी समजुन,
नैराश्याच्या भोवर्यात पडलो.
आठ-दहा दिवसानी
डोळ्यातल पाणीही सुकल,
आणी वेड मन माज
आत्महत्येच्या विचारपर्यन्त पोहोचल.
ओळखीचा एक चेहरा
त्यावेळी आला सावराया,
म्हणाला निर्णय घेताना
आई-वडिलान्चा विचार नको का कराया?
म्हणाला चढ-उतार तर
आयुष्यात येतच राहतील,
प्रत्येकवेळी काय तू
असाच हरुन जाशील?
वेड्या हो सज्ज नव्याने
अन् घे उन्च भरारी,
अपयशाशी युद्ध करण्या
सुरु कर तयारी.
छोट्या अपयशाने डळमळला
तो माणुस कसला?
त्याच्या चार शब्दानी
माझा आत्महत्येचा प्रयत्न फसला.
टिप्पणी पोस्ट करा Blogger Facebook
टिप्पणी पोस्ट करा