२५० सुविचार, व्हाटसअप, फेसबुक स्टेटस - Nice Thoughts - BIG COLLECTION (250) for Whatsapp Facebook Status


आजचा सुविचार : रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

सुविचार ही माणसाच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती आहे.

ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत
उभीच राहू शकत नाही. आणि यदाकदाचित समजा, ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच
असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही.

जीवनात, सुखाचे, दु:खाचे, यशाचे, अपयशाचे, आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग
येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी
राहतात.

आपल्या भौतिक गरजा मर्यादीत ठेवून ध्येयपूर्तीसाठी धडपडणं अयोग्य नाही. पण असं
धडपडूनही अपेक्षित यश लाभलं नाही तर नियती देईल ते आनंदान स्विकारता यायला हवं.

आयुष्यात कुटुंब, कामाचं ठिकाण, नातेवाईक, समाज अशा अनेक ठिकाणी संकटं येतात.
संकटं टाळता येणं शक्य नाही, पण...

पण, दु:ख टाळता येणं शक्य आहे. एखाद्या घटनेकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलता
येते आणि तीच ताकद विचारांमध्ये असते.

कारण कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणूश यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या
प्रत्येकाने हे वाचायला हवं... नव्हे, अगदी १००% आचरणात आणायला हवं !

सुविचार - १ ते २५०

  १) सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.

  २) आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.

  ३) प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान

  ४) जग प्रेमाने जिंकता येतं; शत्रुत्वाने नाही.

  ५) यश मिळवायचं असेल तर स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला.

  ६) प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.

  ७) ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं.

  ८) यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

  ९) प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस !

  १०) चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !

  ११) मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.

  १२) छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.

  १३) आपण जे पेरतो तेच उगवतं.

  १४) फ़ळाची अपेक्षा करुन सत्कर्म कधीच करु नये.

  १५) उशीरा दिलेला न्याय हा न दिलेल्या न्यायासारखा असतो.

  १६) शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम.

  १७) प्रेम सर्वांवर करा पण श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.

  १८) आधी विचार करा; मग कृती करा.

  १९) आयुष्यत आई आणि वडील यांना कधीच विसरु नका,

  २०) फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास
तर जगलास !

  २१) एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.

  २२) अतिथी देवो भव ॥

  २३) अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.

  २४) दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.

  २५) आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल असे कधीही वागू नका

  २६) निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही.

  २७) खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं
काहीतरी शिकण्याची संधी असते.

  २८) उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.

  २९) चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.

  ३०) नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.

  ३१) माणसाची चौथी मूलभूत गरज म्हण्जे पुस्तक.

  ३२) सत्याने मिळतं तेच टिकतं.

  ३३) जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.

  ३४) परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.

  ३५) हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे; मग ती एखाद्या माणसाची असो वा
पशुची !

  ३६) स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.

  ३७) प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.

  ३८) खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची

  ३९) तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.

  ४०) वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं ! डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर
राजहंस !!

  ४१) जो गुरुला वंदन करत नाही; त्याला आभाळाची उंची लाभत नाही.

  ४२) गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.

  ४३) झाडावर प्रेम करणारा माणूस सदैव प्रसन्नच असतो.

  ४४) माणसाचा सगळ्यात मोठा सदगुण म्हणजे त्याची माणुसकी

  ४५) क्रांती हळूहळू घडते; एका क्षणात नाही.

  ४६) सहल म्हणजे माणसिक आनंदाची सामुहिक क्रिडा

  ४७) मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा.

  ४८) आयुष्याच्या प्रवासात प्रवास अत्यावश्यक आहे.

 ४९) बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत सौंदर्य जास्त मोलाचं असतं.

  ५०) मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते

    ५१) तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली यावरुन तुमची श्रीमंती कळते.

    ५२) शिक्षक म्हणजे विद्यार्थ्याचा दुसरा पालकच.

    ५३) मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल
सांगता येत नाही.

    ५४) आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा.

    ५५) एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.

    ५६) परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !

    ५७) खिडकी म्हणजे आकाश नसतं.

    ५८) जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फ़ुलण्यात आहे

    ५९) वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.

    ६०) भाकरी आपल्याला जगवते आणि गुलाबाचं फ़ूल कशासाठी जगायचं हे शिकवते.

    ६१) कविता म्हणजे भावनांचं चित्र!

    ६२) संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.

    ६३) तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच, किंबहुना त्याच्या कित्येक
पटीने देव तुम्हाला देईल.

    ६४) ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !

    ६५) स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका; आणि स्वत:चा
वापर कुणाला करु देऊ नका.

    ६६) अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.

    ६७) तुलना करावी पण अवहेलना करू नये.

    ६८) समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.

    ६९) आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.

    ७०) मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.

    ७१) चेहरा हा आपल्या व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.

    ७२) व्यर्थ गोंष्टींची कारणे शोधू नका; आहे तो परिणाम स्वीकारा.

    ७३) आवडतं तेच करू नका; जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

  ७४) तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

  ७५) अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.

  ७६) विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. 

७७) मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.

७८) आयुष्यात प्रेम कारा ; पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.

७९) आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.

८०) प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.

८१) तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. 

८२) सगळेच निर्णय मनाने घेऊ नका; काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.

८३) काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.

८४) लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.

८५) चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.

८६) तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.

८७) भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद
देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.

८८) चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

८९) आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.

९०) उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही

९१) पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.

९२) अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.

९३) मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.

९४) रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय - मौन !

९५) अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.

९६) अंथरूण बघून पाय पसरा.

९७) कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत; ते मिळवावे लागतात.

९८) तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला, आणि ज्या विषयाची
माहिती नाही त्या विषयी मौन पाळा.

९९) अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.

१००) संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.

 १०१) सन्मित्र शिंपल्यातल्या मोत्यासारखे असतात.

१०२) सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.

१०३) शरीरमाध्यम खलु सर्वसाधनम ॥

१०४) सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत; काही सोडून दिले की आपोआप सुटतात.

१०५) विद्या विनयेन शोभते ॥

१०६) शीलाशिवाय विद्या फ़ुकाची आहे.

१०७) जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.

१०८) एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही.

१०९) कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

११०) आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फ़ार दूर्मिळ असते.

१११) ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा आधिकार
आपल्याला नाही.

११२) कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

११३) देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे
हात घ्यावे !

११४) आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.

११५) मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !

११६) ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.

११७) जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

११८) आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यानां आपण आवडतो
त्यांच्यावर प्रेम करा.

११९) रामप्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो.

१२०) जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं; पण जे आपले नाहीत
त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !

१२१) लक्षात ठेवा-आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.

१२२) कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो तीच माणसं आपल्यापासून फार दूर
जातात.

१२३) जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.

१२४) पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.

१२५) आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.

१२६) गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

१२७) कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

१२८) स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

१२९) ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

१३०) जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार !

१३१) सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

१३३) आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं
म्हणजे अमृत मिळणं.

१३४) एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला
दृष्टीकोन व्यक़्त होतो.

१३५) प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

१३६) आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

१३७) आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं
मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

१३८) स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

१३९) अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

१४०) हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१४१) आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

१४२) बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

१४३) कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

१४४) टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

१४५) नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

१४६) यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

१४७) आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते
आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

१४८) खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं
आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

१४९) जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

१५०) प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.

१५१) स्वातंत्र्य म्हणजे संयम; स्वैराचार नव्हे.

१५२) आयुष्यातला खरा आंनद भावनेच्या ओलाव्यात असतो.

१५३) माणसाने आपल्या आयुष्यात सुख-दुःख मानापमान, स्फूर्ती-निंदा, लाभ हानी,
प्रिय-अप्रिय ह्या गोष्टी समान समजाव्यात.

१५४) जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण.

१५५) तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.

१५६) शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.

१५७) हसा, खेळा पण शिस्त पाळा.

१५८) आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा काय कमावलंत ह्याचा विचार करा.

१५९) स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.

१६०) तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !

१६१) काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

१६२) काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.

१६३) एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार
मिळवत रहा.

१६४) हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !

१६५) उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.

१६६) या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.

१६७) तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय ते आजच ठरवा....आत्ताच !

१६८) केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.

१६९) दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक करायलाही मन मोठं लागतं.

१७०) माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.

१७१) प्रत्येक क्षण अपल्याला काही ना काही शिकवत असतो.

१७२) व्यायामामुळे बुध्दी आणि मन दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.

१७३) काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.

१७४) दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.

१७५) शक्तीचा उपयोग नेहमी शहाणपणाने करा. क्रोधाच्या मार्गाने ती वाया घालवू
नका.

१७६) जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७) दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८) शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९) जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०) परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१) ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२) एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान
हवं.

१८४) बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५) चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६) तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७) दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८) स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९) स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०) त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे
शिकणे हीच विद्या !

१९१) जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२) दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३) पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४) उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५) जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६) मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८) मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे
योग्य.

१९९) बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००) तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.

२०१) गरिबी असूनही दान करतो तो ख्ररा दानशूर.

२०२) स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना.

२०३) प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.

२०४) आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.

२०५) जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.

२०६) सदगुणांना कधीच वार्धक्य येत नाही.

२०७) उषःकाल कितीही चांगला असला तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

२०८) लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.

२०९) मोहाचा पहिला क्षण, ही पापाची पहिली पायरी असते.

२१०) जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच त्याची गोडी साठवलेली
असते.

२११) सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.

२१२) जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही.

२१३) संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात
असतं.

२१४) जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.

२१५) सौंदर्य, सुस्वभाव यांची बेरीज करा, मैत्रीतून मत्सर वजा करा, प्रेमाला
शुध्द अंतःकरणाने गुणा, परमनिंदेचा लघुत्तम काढा, सुविचारांचा वर्ग करा, दया,
क्षमा, शांती, परमार्थ यांचे समीकरण सोडवा... हेच आपल्या सुखी आयुष्याचे गणित
आहे.

२१६) क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते.

२१७) जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल.

२१८) जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार
करावेच लागतील.

२१९) जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.

२२०) वैभव त्यागात असते, संचयात नाही.

२२१) तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास
ठेवा.

२२२) खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऎकावी लागेल.

२२३) मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द.

२२४) पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही
की फसवत नाही.

२२५) ह्रदयात अपार प्रेम असंल की सर्वत्र मित्र
 २२६) टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध
रहा.

२२७) प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका.

२२८) मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य.

२२९) भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो.

२३०) वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे.

२३१) त्याज्य वस्तू फूकट मिळाली तरी स्वीकारू नये.

२३२) शत्रूशीही प्रेमाने वागून त्याला जिंकता येते; पण त्यासाठी संयम असावा
लागतो.

२३३) कृतघ्नतेसारखे दुसरे पाप नाही.

२३४) बनू शकलात तर कृतज्ञ बना, कृतघ्न नको.

१३५) दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे हाही एक अनुभवच आसतो.

२३६) ओरडण्याने ओरडणे बंद होत नाही; स्वस्थ राहण्याने मात्र होते.

२३७) दुःख गरूडाच्या पावलाने येतं आणि मुगींच्या पावलांनी जातं.

२३८) जीवन जगण्याची कला हीच सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.

२३९) एकमेका साहय्य करू । अवघे धरू सुपंथ ॥

२४०) सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.

२४१) श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.

२४२) राष्ट्र निर्माण करायचे असेल तर आधी राष्ट्रनिष्ठा निर्माण करायला हवी.

२४३) संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे.

२४४) असंभवनीय गोष्टी कधीच खऱ्या मानू नयेत.

२४५) उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे रात्र.

२४६) ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.

२४७) जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा
हक्क नही.

२४८) पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.

२४९) मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे.

२५०) दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो





आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी

Post a Comment Blogger

 
Top