तूला विसरणे तसे सोपे आहे...

पाहते कोणाला ही मी
तेव्हा चेहरा तुझाच दिसतो
डोळे बंद केले की
तू निघून जाशील रे
पण कायम डोळे बंद ठेवू शकत नाही म्हणून...
नाहीतर तूला विसरणे तसे सोपे आहे...

बोलताना कोणाशीही मी
तुझ्या असंख्य आठवणी निघतात
बोलणे बंद केले की
तू माझ्या शब्दांतच नसशील रे
पण बडबडणे माझे मी थांबवू शकत नाही म्हणून....
नाहीतर तूला विसरणे तसे सोपे आहे...

ऐकताना बोलणे कोणाचे
तुझेच बोल कानात गुंजतात
कान बंद केले की,
शब्द तुझे ऐकूच येणार नाहीत रे
पण बंद कानांनी जगू शकत नाही म्हणून...
नाहीतर तूला विसरणे तसे सोपे आहे...

मन माझे कायम
तूलाच चिंतते
माझ्याशी भांडते
नी तुझी बाजू घेते
तुझी प्रत्येक गोष्ट आठवणीत ठेवते
मनाला दटावले की परत असे करणार नाही...
पण 'मीच' मनाच्या कव्हेत आहे म्हणून...
नाहीतर तूला विसरणे तसे सोपे आहे...

टिप्पणी पोस्ट करा Blogger

टिप्पणी पोस्ट करा

 
Top